वरुण धवन आणि नताशा दलालच्या लग्नाचे वाजणार सनई चौघडे

वरुण धवन आणि नताशा दलालच्या लग्नाचे वाजणार सनई चौघडे
Varun Dhwan and Natasha Dalal going to get married in Alibaug

मुंबई: अभिनेता वरुण धवन आणि नताशा दलाल यांच्या लग्नाबाबत सध्या चर्चा सुरू आहे बॉलिवूड अभिनेता वरुण धवन आणि त्याची मैत्रीण नताशा दलालचे लग्न चर्चेत आहे.  गेल्या वर्षी या जोडप्याचे लग्न होणार होते पण कोरोनामुळे त्यांचे लग्न पुढे ढकलले गेले. दोघांनी आपल्या लग्नाची तारीख निश्चित केली आहे आणि यावेळी त्यांनी 24 जानेवारी रोजी हा विवाह सोहळा पार पडणार आहे.

अशी बातमी आहेत की धवन आणि दलाल परिवार 5 दिवसाच्या लग्नाच्या कार्यक्रमाची तयारी करत आहेत. एवढेच नव्हे तर मित्र व कुटुंबातील सदस्यांना ऑनलाईन आमंत्रणेही पाठविण्यात आली आहेत. हा विवाह 22 ते 26 जानेवारी दरम्यान अलिबागमध्ये होणार आहे. याचाच अर्थ नताशा दलाल आणि वरुण धवनच्या लग्नाचा धमाकेदार कार्यक्रम 5 दिवस चालणार आहे. 

वरुण धवन आणि नताशा दलाल लहानपणापासूनच एकमेकांना ओळखतात. जून 2019 पासून या दोघांमध्ये लग्नाची चर्चा होती, परंतु कोरोनाच्या संकटामुळे हा कार्यक्रम पुढे ढकलला गेला. या वृत्ताला दुजोरा देत वरुण धवन यांच्या जवळच्या एका सूत्राने सांगितले की कोरोना अद्याप पूर्ण झालेली नसली तरी 10 महिने उलटून गेले आहेत. तेव्हा  हे लग्न किती काळ थांबवता येईल?

मात्र, लग्नाबाबत वरुण धवन किंवा नताशा दलाल यांनी अद्याप कोणतीही औपचारिक माहिती दिलेली नाही. हे पंजाबी लग्न असेल. असेही म्हटले जात आहे की 24 जानेवारीला हे दोघे गाठ बांधतील. 22-25 जानेवारी दरम्यान लग्नाच्या विधी असतील. 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by VarunDhawan (@varundvn)

आता आपण अलिबागला जाणार्‍या बॉलिवूडमधील अनेक सेलेब्रिटींना पाहाल. डेव्हिड धवनचा मुलगा वरुण धवन लग्न करणार आहे. हा एक मोठा पंजाबी विवाह सोहळा असणार आहे.

आणखी वाचा:

No stories found.
Dainik Gomantak
www.dainikgomantak.com