‘मी वसंतराव’: कलाकार घडण्याचा अद्‌भुत प्रवास
‘मी वसंतराव’: कलाकार घडण्याचा अद्‌भुत प्रवासDainik Goamntak

‘मी वसंतराव’: कलाकार घडण्याचा अद्‌भुत प्रवास

या चित्रपटात (Movie) भिन्न-भिन्न प्रेक्षकांना (Audience) भावण्याची क्षमता आहे.

पणजी: ‘मी वसंतराव’ हा चित्रपट अभिजात संगीतातील या महान कलाकाराच्या घडणीचा प्रवास दाखवितो आणि महाराष्ट्रातीलच (Maharashtra) नव्हे तर संपूर्ण भारतातील तसेच जगातील चित्रपट आणि संगीत क्षेत्रातील जाणकारांना प्रेरित करतो, असे प्रतिपादन या सिनेमाचे दिग्दर्शक निपुण धर्माधिकारी यांनी केले. इंडियन पॅनोरमामध्ये (Indian Panorama) या सिनेमाचे प्रकाशन झाल्यानंतर ते पत्रकार परिषदेत बोलत होते.

या चित्रपटात (Movie) भिन्न-भिन्न प्रेक्षकांना (Audience) भावण्याची क्षमता आहे. चित्रपटाची (Movie) कथा व्यक्तिगतरित्या वसंतराव देशपांडे ( Vasantrao Deshpande) यांची असली तरीही त्यामध्ये कलाकार (Artist) होऊ पाहणाऱ्या प्रत्येकासाठी सार्वत्रिक ओढ आहे. जगभरातील चित्रपटांमधून संपूर्ण लांबीच्या सर्वोत्कृष्ट चित्रपटासाठी दिल्या जाणाऱ्या मानाच्या सुवर्णमयूर पारितोषिकासाठीच्या स्पर्धेत (Competitions) असलेला हा चित्रपट, प्रख्यात होण्याआधी वसंतरावांच्या (Vasantrao) जीवनात काय घडले याचे वर्णन करतो.

महाराष्ट्रात, विदर्भातील एका खेड्यात जन्मलेल्या आणि नंतर नागपूर येथे त्यांच्या आईकडून एकहाती जोपासना झालेल्या वसंतरावांचे (Vasantrao) जीवन म्हणजे त्यांच्या आयुष्याला आणि संगीत साधनेला आकार देणाऱ्या उत्कंठावर्धक घटनांचा कॅनव्हास आहे. त्यांचे जीवन घडविणाऱ्या घटनांमध्ये या महान कलाकाराची पु. ल. देशपांडे आणि बेगम अख्तर यांच्या अनोख्या मैत्रीचा, भारतीय सैन्यातील नोकरी, लाहोरमध्ये घेतलेले संगीत शिक्षण,1962 च्या युद्धात भारत-चीन सीमेवर त्यांची झालेली नेमणूक आणि त्यांना मोठी ख्याती मिळवून देणारी ‘कट्यार काळजात घुसली’ या संगीत नाटकात केलेली भूमिका यांचा समावेश आहे.

‘मी वसंतराव’: कलाकार घडण्याचा अद्‌भुत प्रवास
‘गोबेलिन्स’चे लघुपट आमची संपत्ती

‘मी वसंतराव’ (Vasantrao) या चित्रपटात (Movie) वसंतरावांची (Vasantrao) भूमिका त्यांचेच नातू आणि प्रमुख समकालीन शास्त्रीय गायक राहुल देशपांडे यांनी वठविली आहे. त्यांच्या भूमिकेबद्दल बोलताना, दिग्दर्शक (Director) म्हणाले, राहुल देशपांडे यांच्यासोबत मी काम केले आहे आणि आम्ही एकत्रपणे संगीत नाटकांना पुनरुज्जीवित केले. व्यावसायिक अभिनेता नसूनही त्यांनी ही भूमिका अत्यंत समर्थपणे केली आहे. वसंतराव (Vasantrao) यांची अफाट प्रतिभा समजून घेणं सामान्यांच्या कुवतीपालीकडचे असल्यामुळे या चित्रपटाची कथा तयार करण्यास दोन वर्षे लागली, असे धर्माधिकारी म्‍हणाले.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com