प्रसिद्ध मल्याळी अभिनेता अनिल पी यांचा पाण्यात बुडून मृत्यू

गोमन्तक वृत्तसेवा
शनिवार, 26 डिसेंबर 2020

शुटींगसाठी बाहेर गेले असता अनिल काहीकाळ आपल्या मित्रांबरोबर घालवण्यासाठी  एका डॅमवर गेले होते. तेथेच स्नानासाठी गेले असता पाण्यात बुडून त्यांचा मृत्यू झाला.        

मुंबई- दाक्षिणात्य चित्रपटांमधील प्रसिद्ध अभिनेते अनिल पी यांचे निधन झाले आहे. या घटनेमुळे त्यांच्या फॅन्ससहित दाक्षिणात्य इंडस्ट्रीलाच मोठा धक्का बसला आहे. अनिल यांच्या निधनाची वार्ता पोहोचताच त्यांच्या चाहत्यांनी समाज माध्यमांवर प्रचंड शोक व्यक्त केला. शुटींगसाठी बाहेर गेले असता अनिल काहीकाळ आपल्या मित्रांबरोबर घालवण्यासाठी  एका डॅमवर गेले होते. तेथेच स्नानासाठी गेले असता पाण्यात बुडून त्यांचा मृत्यू झाला.        

मिळालेल्या माहितीनुसार  अनिल हे एका चित्रपटाच्या चित्रीकरणासाठी  बाहेर गेले होते. तेथे गेल्यावर आपल्या मित्रांना भेटण्याचे नियोजन ठरल्याने त्यांनी चित्रीकरणातून वेळ काढत काही काळ मित्रांमध्ये घालवण्याचे ठरविले. त्यासाठी ते मित्रांसमवेत एका डॅमवरही गेले. तेथे स्नानासाठी पाण्यात उतरले असता पाण्याचा अंदाज न आल्याने त्यांचा बुडून मृत्यू झाला. डॅममधून बाहेर काढल्यानंतर त्यांना रूग्णालयात दाखल करण्यात आले. तेथे डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. 

या घटनेची माहिती मिळताच केरळचे  मुख्यमंत्री पीनाराई विजयन यांनी अनिल पी यांच्या निधनावर दु:ख व्यक्त करत त्यांना श्रद्धांजली अर्पण केली.  त्यांनी अनिल यांनी साकारलेली पात्रे संस्मरणीय असल्याचे सांगत त्यांच्या अभिनयाची छाप अनेक दर्शकांच्या मनावर राहील असे म्हटले आहे. अनिल यांच्या अचानक निघून जाण्याने मल्याळम इंडस्ट्रीचे मोठे नुकसान झाले असल्याचेही यावेळी मुख्यमंत्री विजयन यांनी म्हटले आहे.  

अनिल यांचे अय्यपन्नुम कोशियुम या चित्रपटासाठी प्रचंड कौतूक करण्यात आले होते. या चित्रपटाचे दिग्दर्शक केआर सचिदानंद यांचे  याच वर्षी निधन झाले. सचिदानंद यांच्या निधनावर दु:ख व्यक्त करताना अनिल पी यांनी आपल्या फेसबुक वॉलवरील त्यांच्याबरोबरचा  फोटो कधीच काढणार नसल्याचे म्हटले होते. आता सचिदानंद यांच्यानंतर अनिल पी यांच्या निघून जाण्याने मल्याळी चाहत्यांना अतिशय दु:ख झाले आहे.

संबंधित बातम्या