‘अग्गबाई सासूबाई’ मालिकेमध्ये परतणार बबड्याचे आजोबा

दैनिक गोमन्तक
शनिवार, 2 जानेवारी 2021

ज्येष्ठ अभिनेते मोहन जोशी, हे आजोबांच्या भूमिकेत ‘अग्गबाई सासूबाई’ या मालिकेत झळकणार आहेत. शोच्या सूत्रांच्या माहितीनुसार मोहन जोशी ऑन-स्क्रीन अजोबाची भूमिका साकारतील याची आता खात्री झाली आहे

मुंबई: झी मराठी वरील एक मालिका सध्या एका चांगल्याच रोमांचक वळणावर येऊन पोहोचली आहे. छोट्या पडद्यावरील तुफान लोकप्रिय ठरत असलेली मराठी मालिका म्हणजे अग्गबाई सासूबाई. सोहमच्या गर्वाचं पाणी होऊन त्याला आता आईची किंमत कळू लागली आहे. त्यामुळे आसावरी आणि सोहम यांच्या नात्यातील दुरावा कमी होताना दिसत आहे. आता या नात्यातील दुरावा कमी करण्यासाठी आणि विशेष म्हणजे नात्यातील गोडवा वाढवण्यासाठी दत्तात्रय बंडोपंत कुलकर्णी म्हणजेच आजोबा पुन्हा एकदा घरी परत येणार आहे.

ज्येष्ठ अभिनेते रवी पटवर्धन हे ‘अग्गबाई सासूबाई’ या मालिकेत आजोबांची भूमिका साकारत होते. दुर्दैवाने 06 डिसेंबर 2020 रोजी त्यांचे निधन झालं. त्यांच्या दमदार अभिनयशैलीमुळे त्यांनी आजोबाची भूमिका खऱ्या अर्थाने जागवली होती. पण आता आजोबाची  भूमिका नेमकी कोणता अभिनेता साकारणार असा प्रश्न चाहत्यांना पडला होता. मात्र, लवकरच प्रेक्षकांना आता आजोबांच्या भूमिकेत एक नवा अभिनेता दिसणार आहे.

ज्येष्ठ अभिनेते मोहन जोशी, हे आजोबांच्या भूमिकेत ‘अग्गबाई सासूबाई’ या मालिकेत झळकणार आहेत. शोच्या सूत्रांच्या माहितीनुसार मोहन जोशी ऑन-स्क्रीन अजोबाची भूमिका साकारतील याची आता खात्री झाली आहे येत्या ४ जानेवारी रोजी होणाऱ्या भागात प्रेक्षकांना “सोम्या कोंबडीच्या, अरे चप्पलचोर” हा आवाज पुन्हा ऐकायला मिळणार आहे. मोहन जोशी आजोबांच्या भूमिकेतून या मालिकेत सहभागी होणार आहेत.

शोमध्ये आशुतोश पत्की सोहम, तेजश्री प्रधान शुभ्राची भूमिका साकारत आहेत. आसवारीचे पात्र निवेदिता जोशी यांनी साकारले आहे, आणि गिरीश ओक अभिजीतची भूमिका साकारत आहेत.

संबंधित बातम्या