आधीच्या प्रेयसीसाठी सायरा बानो यांना साखरपुड्यातच सोडून गेले होते दिलीप कुमार

गोमंतक ऑनलाईन टीम
सोमवार, 7 डिसेंबर 2020

सायरा बानो दिलीप कुमार यांच्यापेक्षा २२ वर्षांनी लहान आहे. या दोघांच्या प्रेमाचे किस्से मीडियात कायमच ऐकायला मिळू शकतात. आता सायरा बानो यांनी आणखी एक नवीन किस्सा सांगितला आहे.

मुंबई- हिंदी सिनेसृष्टीचा एक सुप्रसिद्ध अभिनेता दिलीप कुमार शुक्रवारी आपला ९८वा वाढदिवस साजरा कऱणार आहे. अभिनेत्री सायरा बानो बरोबरची त्यांची जोडी म्हणजे एकेकाळची भारतातील सुप्रसिद्ध जोडी मानली जायची. सायरा बानो आजही त्यांच्या  आरोग्याची काळजी उत्तम घेतात. या कपलच्या प्रेमाचे किस्से म्हणजे कित्येक वर्ष लोकांच्या चर्चेचा विषय होते. नुकताच अभिनेत्री सायरा बानो यांनी दिलीप कुमार यांच्याबाबत एक धक्कादायक खुलासा केला आहे.

सायरा बानो दिलीप कुमार यांच्यापेक्षा २२ वर्षांनी लहान आहे. या दोघांच्या प्रेमाचे किस्से मीडियात कायमच ऐकायला मिळू शकतात. आता सायरा बानो यांनी आणखी एक नवीन किस्सा सांगितला आहे. दिलीप कुमार यांच्यासोबत साखरपुडा करताना दिलीप यांनी साखरपुडा अर्ध्यावर सोडून दूम ठोकली होती. याचे कारण होते दिलीप कुमार यांची जुनी गर्लफ्रेंड. 
 
सायरा बानो यांनी नुकताच एका इंग्रजी माध्यमाशी संवाद साधला. यात त्यांनी दिलीप कुमार यांचे आरोग्य आणि दोघांमधील प्रेमाबाबत बरीच चर्चा केली आहे. आपल्या साखरपुड्याबाबत बोलताना बानो यांनी सांगितले की,'जेव्हा आमचा साखरपुडा होत होता तेव्हा एक मुलगी होती जी सिनेसृष्टीतील नव्हती. त्यावेळी अशी चर्चा होती की ती दिलीप साहेबांची प्रेमिका होती. आणि तिने साखरपुड्याच्या वेळी झोपेच्या गोळ्या खाऊन घेतल्या होत्या. 

बानो यांनी पुढे म्हटले की, 'दिलीप साहेबांना याबाबत माहिती पडल्यावर त्यांनी साखरपुडा अर्ध्यावर सोडून तिच्याजवळ पोहचले आणि तिला समजावले की ते माझ्यावर प्रेम करतात. त्यांनी मोठे प्रयत्न करून त्या मुलीला शांत केले आणि परत आपल्या साखरपुड्याच्या आयोजनात आले. मला मात्र, अशा गोष्टींची नंतर सवयच पडली होती. कित्येक मुली त्यांच्या कारच्या समोर उभ्या राहून जात होत्या आणि दिलीप कुमार यांनी त्यांच्यावर कार चढवावी अशी त्यांची इच्छा असायची. 

संबंधित बातम्या