'चला हवा येऊ द्या’ च्या सेटवर होणार सदाबहार एण्ट्री

दैनिक गोमन्तक
शुक्रवार, 8 जानेवारी 2021

या कलाकारांमध्ये अभिनेता अशोत सराफ, निवेदिता जोशी-सराफ, मोहन जोशी, रोहिणी हट्टंगडी, अशोक पत्की, अशोक हांडे, जयंत सावरकर हे ज्येष्ठ आणि एव्हरग्रीन कलाकार हजेरी लावणार आहेत. ‘एव्हरग्रीन सिनिअर’ असे या भागाचे नाव आहे.

मुंबई: सध्या टेलिव्हिजनवर आवर्जून पाहावा असा  प्रेक्षकांचं मनोरंजन करणारा कार्यक्रम म्हणजे चला हवा येऊ द्या.  काही निवडक कार्यक्रमांपैकी एक विनोदी कार्यक्रम ‘चला हवा येऊ द्या’ चा प्रामुख्यानं उल्लेख करावा लागेल. सहा दशकांहून अधिक काळ रसिक प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य करणारा कार्यक्रम म्हणून चला हवा येऊ द्याचं स्थान अव्वलच आहे. या कार्यक्रमात आपल्या चित्रपटाचं, गाण्याचं, नव्या कुठल्याही  एखाद्या कार्यक्रमाचं प्रमोशन व्हावं यासाठी अनेकजण प्रयत्न करत असतात.

सध्या मराठी चित्रपटाला आपल्या कलेनं समृध्द करणा-या जून्या कलावंतांना एकत्र बोलावून त्यांच्या आठवणीला उजाळा या कार्यक्रमात देण्यात आला आहे. त्यासाठी अनेक जूने मराठी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध कलाकार चला हवा येऊ द्या च्या सेटवर  लवकरच हजेरी लावणार आहे. या कलाकारांमध्ये अभिनेता अशोत सराफ, निवेदिता जोशी-सराफ, मोहन जोशी, रोहिणी हट्टंगडी, अशोक पत्की, अशोक हांडे, जयंत सावरकर हे ज्येष्ठ आणि एव्हरग्रीन कलाकार हजेरी लावणार आहेत. ‘एव्हरग्रीन सिनिअर’ असे या भागाचे नाव आहे. या आठवड्यात ‘चला हवा येऊ द्या’मध्ये  एव्हरग्रीन सिनिअर या संकल्पनेनुसार  मराठी कलाविश्वीतील ज्येष्ठ कलाकारांना विशेष आमंत्रित केलं जाणार आहे. गेल्या कित्येक वर्षांपासून प्रेक्षकांच्या मनावर राज्य करणारे कलाकार या विशेष भागात प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत.

सहा वर्षे झाली या मालिकेनं लोकप्रियतेचा मोठा विक्रम गाठला आहे. लहानांपासून मोठ्यांपर्यत सर्वांना वेड लावलं. न थकता प्रेक्षकांचं मनोरंजन करणारा कार्यक्रम म्हणजे चला हवा येऊ द्या. या कार्यक्रमामधील कलाकारांनी प्रेक्षकांना खळखळून हसवलं.त्याचसोबत या मंच्याच्या माध्यमातून अनेक दिग्गज कलाकारदेखील प्रेक्षकांच्या भेटीला आले आहेत. तेव्हा आता ‘चला हवा येऊ द्या’ या कार्यक्रमामध्ये या आठवड्यात एव्हरग्रीन सिनिअर या थीमच्या अंतर्गंत मराठी चित्रपटसृष्टीतील कलाकारांची भेट प्रेक्षकांना होणार आहे.

 

 

 

संबंधित बातम्या