मोठ्या पडद्यावर गांधीगिरी करणाऱ्या दिग्दर्शकाचा आज वाढदिवस...

गोमन्तक वृत्तसेवा
शुक्रवार, 20 नोव्हेंबर 2020

अभिनेता होण्यासाठी पुण्याच्या एफटीआय़आय मध्ये आलेल्या राजकुमार हिराणी यांनी अचानक विचार बदलत दिग्दर्शनात स्वत:ला आजमावयाचे ठरविले.  नाटकमार्गे सिनेमा क्षेत्रात आलेल्या या दिग्दर्शकाचा आज वाढदिवस...

मुंबई- सिनेजगतात जवळपास सर्वांच्याच परिचयाच्या दिग्दर्शकाचा म्हणजेच राजकुमार हिराणीचा आज वाढदिवस आहे. आयुष्यात काहीतरी नवीन करायचे या हेतूने सुरू झालेला प्रवास बॉलिवूडला चांगले दिवस आणण्यास मोलाचा ठरला. नाटकमार्गे सिनेमा क्षेत्रात येत त्याने अक्षरश: धुमाकूळ घातला.  

मुन्नाभाई पहिला चित्रपट- 

अभिनेता होण्यासाठी पुण्याच्या एफटीआय़आय मध्ये आलेल्या राजकुमार यांनी अचानक विचार बदलत दिग्दर्शनात स्वत:ला आजमावयाचे ठरविले. सुरूवातीला जाहिरांतीमधून सुरूवात करून त्यांनीनंतर सिनेमांच्या संकलनाचे कामही केले. 'तेरे लिए', 'मिशन काश्मिर' या सिनेमांचे संकलन केल्यानंतर त्यांनी २००३ मध्ये आपला पहिला सिनेमा करण्याचे ठरविले. 

मुन्नाभाईपासून सुरू झालेला प्रवास आजतागायत सुरूच आहे. या काळात त्यांनी अनेक दर्जेदार चित्रपट दिले. 'लगे रहो मुन्नाभाई' या चित्रपटात गांधीगिरी करणारा संजय दत्त अजूनही प्रेक्षकांच्या स्मरणात आहे. त्यानंतर आलेल्या थ्री इडियट्सने तर बॉलिवूडचे जवळपास सगळेच विक्रम मोडून काढले. या चित्रपटांमुळे हिराणी यांना भारतातच नाही तर जगभर ओळख मिळाली. थोडा वादात सापडलेला चित्रपट 'पीके'ने संवेदनशील प्रेक्षकांच्या काळजाचा ठाव घेतला. असे अनेक चित्रपट करून राजकुमार यांनी भारतीय चित्रपट सृष्टीला एका साच्यातून बाहेर काढले.    

 

संबंधित बातम्या