खरंच काचेवर पडलेले प्रतिबिंब कतरिना कैफ आणि विकी कौशलचं होतं का?

दैनिक गोमन्तक
रविवार, 3 जानेवारी 2021

बॉलिवूड अभिनेत्री कॅटरिना कैफ आणि विक्की कौशल एकमेकांना डेट करत असल्याची अफवा पसरली आहे. 

मुंबई: बॉलिवूड अभिनेत्री कॅटरिना कैफ आणि विक्की कौशल एकमेकांना डेट करत असल्याची अफवा पसरली आहे. या नवीन अफवाच्या जोडीची अलीकडेच शहरात बरीच चर्चा रंगली आहे. कतरिना आणि विक्की दोघांनीही आपले वैयक्तिक जीवन सार्वजनिक चर्चेपासून दूर ठेवण्याचा प्रयत्न केला पण यावेळी त्यांच्या चाहत्यांनी काहीतरी पकडले. कतरिना आणि विक्की या दोघांनीही इसाबेला कैफ आणि सनी कौशल या बहिणींसोबत नवीन वर्षाची या दोघांनी एकत्र पार्टी साजरी केली. त्या दोघांनी त्यांच्या सोशल मीडिया अकाउंट्सवर आपापल्या भावंडासोबतचे फोटो शेअर केले. जरी या दोघांचे कोणतीही फोटो  एकत्रित नसले तरी त्यांच्या चाहत्यांनी त्यांच्या वैयक्तिक फोटोमध्ये सेम बॅकग्राउंड बघायला मिळाले आणि कतरिना विकीसोबत असल्याचा आणखी एक पुरावा चाहत्यांना मिळाला. तेव्हापासून विकी आणि कॅटरिना या प्रेमी युगलांनी एकत्रितपणे 2021 हे नवीन वर्ष साजरे केले असा अंदाज वर्तविला जात आहे.

या दोघींच्या मागे असलेल्या काचेवर कतरिना आणि विकी कौशलचं प्रतिबिंब सहज बघायला  मिळत आहे. कतरिनाला फोटोतील ही गोष्ट समजताच तिने सोशल मीडियावरून तो फोटो डिलिट केला. मात्र तोपर्यंत तो फोटो  व्हायरल झाला होता.

 

 

संबंधित बातम्या