अखेर विकी आणि कॅटरीनाच्या नात्यावर शिक्कामोर्तब 'या' अभिनेत्याचा खुलासा

गोमंन्तक वृत्तसेवा
बुधवार, 9 जून 2021

दिवाळीमधील एका पार्टीमध्ये या दोघांचे फोटो सोशल मिडियावर प्रचंड व्हायरल झाले होते.

बॉलिवूड (Bollywood) अभिनेता विकी कौशल(Vicky Kaushal) आणि कॅटरीना कैफ यांचं रिलेशनशिप खूप चर्चेत आहे. विकी कौशलला अनेकदा कॅटरीना कैफच्या (Katrina Kaif) घरा बाहेर स्पॉट केलं आहे. विकी कौशलच्या वाढदिवसा दिवशी कॅटरिना कैफने सोशल मीडियावर (Social media) एक फोटो शेअर करत त्याला शुभेच्छा दिल्या होत्या. 

दिवाळीमधील एका पार्टीमध्ये या दोघांचे फोटो सोशल मिडियावर प्रचंड व्हायरल झाले होते. त्यानंतर दोघेही रिलेशनशीपमध्ये (Relationship) आहे अशा चर्चा रंगल्या होत्या, मात्र दोघांनी अजूनही आपल्या रिलेशनशिपबद्दल जाहीर केलं नसलं तरी  सोनम कपूरच्या भावाने म्हणजेच हर्षवर्धन कपूरने त्यांची पोल खोल्ली आहे. (Vicky and Katrinas relationship finally revealed)

अभी तो मै जवान हूं' अभिनेते धर्मेंद्र यांचा व्हिडिओ होतोय व्हायरल...

दरम्यान, विकी आणि कॅटरीना एकमेकांना 2019 पासून डेट करत आहेत. हर्षवर्धन कपूरला (Harshvardhan Kapoor) झुम टिव्हीवरील 'बाय इनवाइट ओनली सीज़न 2' मध्ये विचारण्यात आले होते की, विकी आणि कॅटरीना हे रिलेशनशीपमध्ये मध्ये आहेत? त्यावर हर्षवर्धन ने उत्तर दिले कि ''हो हे खरं आहे, हर्षवर्धनच्या या उत्तराने चाहते चांगलेच उत्साहीत झाले.  मात्र विकी आणि कॅटरिना यांनी अद्याप रिलेशनशिपबद्दल बोलत नसले तरी ते दोघे अनेकदा एकमेकांसाबोत सोबत दिसतात. विकी कौशल हा एक प्रसिद्ध अभिनेता आहे, तसेच 'उरी:द सर्जिकल स्ट्राईक्स' (Uri: The Surgical Strikes) या सिनेमानंत त्याच्या प्रसिध्दीत अधिकच भर पडली. 

संबंधित बातम्या