'विकी डोनर' फेम अभिनेत्याचं कर्करोगामुळे निधन

गोमन्तक वृत्तसेवा
गुरुवार, 24 सप्टेंबर 2020

हिंदीतून केलेल्या या ट्विटमध्ये भुपेशला विद्यालयाच्यावतीने श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. हिंदी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेता मनोज वाजपेयी, मुकेश छाब्रा, गजराज राव यांच्याकडूनही ट्विटरवरून या हरहून्नरी अभिनेत्याला श्रद्धांजली वाहण्यात आली.

नवी दिल्ली: 'विकी डोनर, परमाणू या चित्रपटांमधून नावारूपाला आलेला अभिनेता भुपेश पांड्याचे फुफ्फुसाच्या कर्करोगाने निधन झाले. राष्ट्रीय नाट्य विद्यालयाकडून(NSD) त्याच्या मृत्यूचे वृत्त ट्विट करण्यात आले आहे. भुपेश हा राष्ट्रीय नाट्य विद्यालयाच्या २००१च्या बॅचचा विद्यार्थी असून ही बातमी अतिशय दु:खद असल्याची भावना यावेळी विद्यालयाकडून व्यक्त करण्यात आली. 

हिंदीतून केलेल्या या ट्विटमध्ये भुपेशला विद्यालयाच्यावतीने श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. हिंदी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेता मनोज वाजपेयी, मुकेश छाब्रा, गजराज राव यांच्याकडूनही ट्विटरवरून या हरहून्नरी अभिनेत्याला श्रद्धांजली वाहण्यात आली.

दरम्यान, भुपेशला फुफ्फुसाच्या कर्करोगाचं निदान झाल्यावर त्याच्यावर पुढील उपचारांसाठी ट्विटरच्या माध्यमातून निधी उभरण्याचे आवाहन अभिनेता मनोज वाजपेयी, आदिल हुसैन, राजेश तेलंग यांच्याकडून  त्यांच्या चाहत्यांना करण्यात आले होते. मात्र, उपचारांआधीच त्याचा या आजाराने जीव घेतला.    

भुपेश पांड्या हा रंगभूमीवरील एक प्रसिद्ध अभिनेता होता. रंगभूमीसोबतच हिंदी चित्रपटांतूनही त्याने काम करायला सुरूवात केली. 'विकी डोनर'मध्ये साकारल़ेल्या अन्नु कपूर यांचा सहायक 'चमन'ची भुमिका त्याने अतिशय सुंदर वठवली होती. या बरोबरच त्याने 'हजारों ख्वाहिशें', 'दिल्ली क्राईम' ही वेबसीरिज आणि जॉन अब्राहमची प्रमुख भुमिका असलेल्या 'पोखरण' या चित्रपटातूनही काम केले आहे.

संपादन: ओंकार जोशी

संबंधित बातम्या