विकी कौशलने लग्नाच्या प्रश्नावर दिलं दिलखुलास उत्तर

लग्नाचे इतके दिवस झाले असताना आता विकीने त्याच्या गुप्त लग्नाच्या सुंदर क्षणांबद्दल सांगितले आहे. हे जाणून या जोडप्याच्या चाहत्यांना खूप आनंद झाला आहे.
विकी कौशलने लग्नाच्या प्रश्नावर दिलं दिलखुलास उत्तर
Vicky Kaushal and Katrina Kaif Latest NewsDainik Gomantak

विकी कौशल आणि अभिनेत्री कतरिना कैफ यांच्या लग्नाला चार महिने झाले आहेत. या जोडप्याने 9 डिसेंबर 2021 रोजी राजस्थानमधील 'सिक्स सेन्स फोर्ट' येथे अचानक लग्न करून सर्वांना आश्चर्यचकित केले. त्यांचा विवाह अत्यंत शाही आणि गुप्त पद्धतीने पार पडला. मात्र, लग्नाचे इतके दिवस झाले असताना आता विकीने त्याच्या गुप्त लग्नाच्या सुंदर क्षणांबद्दल सांगितले आहे. हे जाणून या जोडप्याच्या चाहत्यांना खूप आनंद झाला आहे.

Vicky Kaushal and Katrina Kaif Latest News
Video : ईदच्या पार्टीत शहनाजने सलमान खानकडे केली ही मागणी...

लग्न झाल्यापासून विकी-कतरिनाने उघडपणे एकमेकांबद्दलचे प्रेम व्यक्त केले आणि त्यांच्या सुंदर केमिस्ट्रीने लोकांची मने जिंकली. दोघेही एकमेकांबद्दल कमी बोलू शकतात, परंतु त्यांची एकत्र उपस्थिती लोकांची मने जिंकण्यासाठी पुरेशी आहे.

वास्तविक, विकीने नुकतेच हॅलो इंडिया मॅगझिनसाठी फोटोशूट केले आणि यावेळी त्याच्या लग्नाबद्दल आणि कतरिनाबद्दल खूप चर्चा झाली. मुलाखतीदरम्यान, जेव्हा विकीला विचारण्यात आले - तू तुझ्या लग्नाच्या दिवसातील तुझा आवडता क्षण आमच्यासोबत शेअर करू शकतोस का? तर विकीने हसत उत्तर दिलं, "हे सगळं काही क्षणापुरतं नाही".

याआधी 'हॅलो इंडिया' मॅगझिनसोबतच्या संभाषणात विकी कौशलने पत्नी कतरिनाचे कौतुक केले होते आणि कतरिना कैफला पत्नी म्हणून मिळाल्याने मी धन्यता मानत असल्याचे सांगितले होते. कतरिना तिच्या आयुष्यातील प्रत्येक पैलूवर विशेष प्रभाव पाडते. स्वत:ला नशीबवान म्हणत, त्याने असेही सांगितले की, कतरिनाच्या रूपात त्याला एक जीवनसाथी मिळाली जी खूप समजूतदार, बुद्धिमान आणि दयाळू व्यक्ती आहे. जिच्याकडून तो रोज खूप काही शिकत असतो.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.