कोरोनाने केली विकी कौशलवर सर्जिकल स्ट्राईक

vicky kaushal.jpg
vicky kaushal.jpg

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत सध्या संपूर्ण देशभरात परिस्थिती चिंताजनक होताना दिसते आहे. सामान्य जनतेपासून बॉलिवूड इंडस्ट्रीला देखील या विषाणूमुळे सर्वाधिक त्रास सहन करावा लागला आहे. चित्रपट प्रदर्शित होण्यासंदर्भात असो अथवा सेलिब्रेटींना या विषाणूची लागण असो. आता पुन्हा एकदा चित्रपट सृष्टीत कोरोनाच्या विषाणूने एंट्री मारली असल्याचे पाहायला मिळते आहे. कारण बॉलिवूडच्या अनेक  कलाकारांना एका पाठोपाठ कोरोना संसर्ग होतोना दिसून येतो आहे. (Vicky kaushal tested corona positive)

काही दिवसांआधीच बॉलिवूडचा खिलाडी अक्षय कुमारचा कोरोना चाचणीचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. त्याच्यासोबत काम करणाऱ्या राम सेतू चित्रपटाच्या टीम मधील जवळपास 50 पेक्षा जास्त लोक कोरोना बाधित झाल्याचे समोर आले होते. त्यानंतर आज अभिनेता विकी कौशलने  आपली कोरोना चाचणी साकारात्मकी आल्याचे सांगितले आहे. इंस्टाग्रामवर पोस्ट शेअर करत अभिनेता विकी कौशलने ही माहिती दिली आहे. यावेळी "सर्व काळजी आणि खबरदारी घेऊन सुद्धा दुर्दैवाने आपण कोरोना बाधित झालो असल्याचे समजले आहे. तरी सर्व अत्यावश्यक नियमांचे पालन करून आपण डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार औषधोपचार करीत आहोत.'' या आशयाची पोस्ट विकी कौशलने शेअर केली आहे. तसेच पुढे विकी कौशलने संपर्कात आलेल्या सर्वांना कोविड टेस्ट करवून घेण्याचे आवाहन केले आपल्या इंस्टाग्राम पोस्ट मधून केले आहे.

दरम्यान, यापूर्वी अक्षय कुमार (Akshay KUmar), रणवीर कपूर, आलिया भट्ट, कार्तिक आर्यन, आमिर खान आणि आर माधवन यांना कोरोनाचा संसर्ग झाल्याचे समोर आले होते. अभिनेता रणवीर कपूरची कोरोना चाचणी (Corna Test) 9 मार्च रोजी पॉझिटिव्ह आल्याची माहिती त्याची आई नीतू कपूर यांनी सोशल मीडियाच्या इन्स्टाग्राम वरून दिली होती. यानंतर आलिया भट्ट, कार्तिक आर्यन यांनी देखील सोशल मीडियाच्या (Media) इन्स्टाग्राम वरून आपला कोरोना अहवाल सकारात्मक आल्याचे म्हटले होते.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com