Video: विकी कौशलचा कॉलेजच्या दिवसांचा व्हिडिओ होतोय व्हायरल

विकी कौशलची माफी मागताना शिरीनने त्याचा एक थ्रोबॅक व्हिडिओ (Vicky Kaushal Throwback) शेअर केला
Video: विकी कौशलचा कॉलेजच्या दिवसांचा व्हिडिओ होतोय व्हायरल
vicky kaushal and katrina kaifDainik Gomantak

बॉलिवूड अभिनेता विकी कौशलने (Vicky Kaushal) आपल्या अभिनयाच्या जोरावर फार कमी वेळात मोठी प्रसिद्धी मिळवली आहे, जी मिळवण्यासाठी अनेक कलाकारांना खूप वेळ लागतो. चित्रपट दिग्दर्शक श्याम कौशल यांचा मुलगा असूनही त्याने आपली पूर्ण मेहनत, जिद्द आणि अभिनय क्षेत्रात आपले समर्पण दाखवून स्वत:ला सिद्ध केले. विक्की कौशने 2015 मध्ये आलेल्या 'मसान' चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले त्यापुर्वी दिग्दर्शक अनुराग कश्यपचा सहाय्यक म्हणूनही त्याने काम केले आहे. (Vicky Kaushal Viral Video)

vicky kaushal and katrina kaif
Video: धर्मेंद्र यांनी देव आनंद यांच्या आयुष्याशी संबंधित रहस्यांचा केला खुलासा

एकेकाळी प्रसिद्ध टीव्ही शो 'ये है मोहब्बतें'मध्ये सिम्मी ची भूमिका साकारणारी अभिनेत्री शिरीनने इंस्टाग्रामवर आस्क-मी-ऐनीथिंग सेशन आयोजीत केला होता. आणि त्यात विकीला अप्रत्यक्ष तीने सहभागी करून घेतलं. जेव्हा एका सोशल मीडिया वापरकर्त्याने तिला विकी कौशलसोबतचा एक जुना व्हिडिओ शेअर करण्यास सांगितले. तेव्हा विकी कौशलची माफी मागताना शिरीनने त्याचा एक थ्रोबॅक व्हिडिओ (Vicky Kaushal Throwback) शेअर केला आहे ज्यामध्ये विकीला ओळखणे त्याच्या चाहत्यांसाठी खुप कठीण आहे.

व्हिडीओ शेअर करताना शिरीनने मागितली माफी

आणि त्याला 'हा व्हिडिओ शेअर केल्याबद्दल मी आधीच हात जोडून तुमची माफी मागते आहे.'असे कॅप्शनही दिले आहे. विकी कौशलने त्याची लॉन्ग टाइम गर्लफ्रेंड कतरिना कैफसोबत गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये लग्नगाठ (Vicky Kaushal Katrina Kaif) बांधली. या थ्रोबॅक व्हिडिओबद्दल सांगायचे तर, यातही विकीचा अप्रतिम अभिनय स्पष्टपणे त्याच्या चाहत्यांना पाहायला मिळतो आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.