Video: ‘हरफनमौला’ गाण्यातील आमिर खान आणि एली अवरामची केमिस्ट्री बघून चाहत्यांची उडाली झोप

गोमन्तक वृत्तसेवा
बुधवार, 10 मार्च 2021

दिग्दर्शक अमीन हाजी यांच्या 'कोई जाने ना' या चित्रपटाचे ‘हरफनमौला’ हे नवीन गाणे आज बुधवारी प्रदर्शित झाले. गाण्यात एली अवराम आणि आमिर खान जबरदस्त स्टाईल डान्स करतांना दिसत आहेत.

मुंबई: दिग्दर्शक अमीन हाजी यांच्या 'कोई जाने ना' या चित्रपटाचे ‘हरफनमौला’ हे नवीन गाणे आज बुधवारी प्रदर्शित झाले. गाण्यात एली अवराम आणि आमिर खान जबरदस्त स्टाईल डान्स करतांना दिसत आहेत. गाण्यात आमिर खान आणि एली अवरामची केमिस्ट्री प्रेक्षकांना खूप आवडली आहे आणि सर्वत्र त्याची चर्चा सुरू झाली आहे. 

'हरफनमौला' गाण्याचे बोल अमिताभ भट्टाचार्य यांनी लिहिले आहे. याशिवाय हे गाणे जारा खान आणि विशाल दादलानी यांनी गायले आहे.  तर या गाण्याला तनिष्क बागची यांनी संगीत दिले आहे. हे गाणे प्रसिद्ध होवून 2 तासदेखील झाले नाही तर 5 लाखाहून अधिक लोकांनी बघितले आहे. टी-सीरिज यूट्यूब चॅनलवर हे गाणं अपलोड करण्यात आलं आहे ज्यात आमिर खानचा जबरदस्त डान्स अवतार बघायला मिळाला.

पाकिस्तानातही भाजप सरकार असेल; कंगनाच्या नव्या दाव्याची चर्चा 

मोठ्या ब्रेकनंतर बॉलिवूडटचा मिस्टर परफेक्शनमॅन ‘कोई जाने ना’ या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. आमिर खानचा ‘कोई जाने ना’ चित्रपट 26 मार्चला प्रदर्शित होणार आहे. या सिनेमातील ‘हरफनमौला’ या गाण्याचा टीझर नुकताच रिलीज झाला आहे. या व्हिडीओत प्रेक्षकांना आमिर खान आणि एली अवरामचा रोमांस बघायला मिळत आहे. या टीझर सोशल मीडियावर प्रचंड धुमाकुळ घातला आहे.

राखी सावंतचा नागीन अवतार 

‘हरफनमौला’ या गाण्याचा टीझर अभिनेत्री एली अवरामने इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केला आहे. एलीचा हॉट लूक या टिझरमध्ये बघायला मिळत आहे. तर आमिर खानचा रोमॅण्टिक अंदाज प्रेक्षकांना घायाळ करून सोडत आहे. या गाण्यातील खास बाब म्हणजे आमिर खानचा लूक त्याने स्वत: निवडला आहे. आमिर नेहमीच त्याच्या चित्रपटासाठी वेगवेगळ्या कल्पना सूचवत असतो. या गाण्यासाठी देखील सेफी फॉर्मल लूक असावा असे त्याने दिग्दर्शकांना सुचवले होते.

 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Elli AvrRam (@elliavrram)

संबंधित बातम्या