शक्तीमान! अनुष्का शर्माने विराट कोहलीला हवेत उचलले

गोमंन्तक वृत्तसेवा
गुरुवार, 8 एप्रिल 2021

अनुष्का शर्मा आणि विराट कोहलीचा एक व्हिडिओ खूप व्हायरल होत आहे, ज्यामध्ये अभिनेत्रीने विराटला हवेत उंचलून धरण्याचा प्रयत्न केला आहे. विशेष म्हणजे तीची हा प्रयत्न य़शस्विदेखील झाला आहे.

नवी दिल्ली: बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री अनुष्का शर्मा आणि विराट कोहली हे दोघेही लोकांच्या आवडत्या जोडीपैकी एक आहे. दोघींचेही फोटो असो किंवा व्हिडिओ सोशल मीडियावर अनेकदा व्हायरल होतात. ते दोघही आपल्या हटके स्टाईलने प्रत्येकाचे मन जिंकताना दिसत असतात. अलीकडेच अनुष्का शर्मा आणि विराट कोहलीचा एक व्हिडिओ खूप व्हायरल होत आहे, ज्यामध्ये अभिनेत्रीने विराटला हवेत उंचलून धरण्याचा प्रयत्न केला आहे. विशेष म्हणजे तीची हा प्रयत्न य़शस्विदेखील झाला आहे.  हा व्हिडिओ अनुष्का शर्माने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून शेअर केला आहे, जो आतापर्यंत 19 लाखाहून अधिक वेळा पाहिला गेला आहे. 

व्हिडिओमध्ये अनुष्का शर्मा विराट कोहलीसोबत दिसली आहे. दरम्यान, ती विराट कोहलीला उंचलण्याचा प्रयत्न करते आणि या कामात ती यशस्वीही होते. अनुष्का शर्माच्या या कामामुळे विराट कोहलीही प्रभावित झाला आहे आणि तो पुन्हा अनुष्काला असं उचलून धरण्यास सांगत आहे. हा व्हिडिओ शेअर करताना "मी हे खरच केले?" असे कॅप्शनतीने तीने दिले आहे.

Happy Birthday Allu Arjun: अल्लु अर्जूनच्या लग्नाची गोष्ट; वडिलांना पाठवंल होतं तिच्या घरी 

अनुष्का शर्मा आणि विराट कोहलीच्या या व्हिडिओवर कमेंट करतांना चाहते आणि कलाकारही थकले नाहीत.  दीया मिर्झाने सुध्दा पार्ट शेप करत कमेंट केली आहे. "शक्तीमान अल्ट्रा प्रो मॅक्स ..."असे एका फॅन ने लिहिले आहे.  विराट कोहली आणि अनुष्का शर्मा वामिका नावाची गोड मुलगी आहे. 

संबंधित बातम्या