'एक पल का जीना' गाण्यावर थिरकली प्रसिद्ध पार्श्वगायिकेची पावलं; VIDEO

गोमंन्तक वृत्तसेवा
मंगळवार, 4 मे 2021

निळ्या रंगाच्या साडीमध्ये आशा भोसलेंची डान्स शैली हटके आहे. हृतिक रोशनच्या 'एक पल का जीना' या गाण्यावर त्यांनी डान्स केला आहे. आणि त्या हृतिक रोशनप्रमाणे नाचतांना दिसत आहे.

मुंबई: हिंदी चित्रपट जगातील प्रसिद्ध पार्श्वगायिका(Play Back Singer) आशा भोसले यांनी आपल्या मधुर आवाजाने संपूर्ण जगाची मने जिंकली. शास्त्रीय संगीत, गझल आणि पॉप संगीत या प्रत्येक क्षेत्रात आपल्या आवाजाची जादू पसरविणाऱ्या आशा ताई आता नृत्य जगातही आपली छाप सोडतांना दिसत आहे. सोशल मीडियावर सध्या आशा भोसलेंचा(Asha Bhosle) एक व्हिडिओ(Video) व्हायरल होत आहे ज्यामध्ये त्या नाचताना दिसत आहे.(Famous playback singer Asha Bhosle danced to the song of Ek Pal Ka Jina)

आशा ताईंनी त्यांच्या आतापर्यंतच्या चित्रपट प्रवासात जवळपास 16000 गाण्यांसाठी आपला आवाज दिला आहे. लोकांना त्याच्या गाण्यात रस आहेच पण त्याचे हे  नृत्य पाहून सर्वांनाच आश्चर्य वाटले. फिल्मफेअरने त्यांच्या इन्स्टाग्राम हँडलवरून हा थ्रोबॅक व्हिडिओ शेअर केला आहे. व्हिडिओमध्ये त्या हृतिक रोशनच्या गाण्यावर स्वत: च्या सिग्नेचर स्टेप करताना दिसत आहे. 

कंगना रणावतच्या ट्विटर आकाऊंट ब्लॉकनंतर संस्पडेंड हॅशटॅगने ट्विटरवर घातला धुमाकुळ 

निळ्या रंगाच्या साडीमध्ये आशा भोसलेंची डान्स शैली हटके आहे. लोकांना त्यांची ही शैली फार आवडला आहे. परंतु आतापर्यंत चाहते आशा ताईच्या नृत्यावर चाहते प्रेमाचा वर्षाव करत आहेत. हृतिक रोशनच्या 'एक पल का जीना' या गाण्यावर त्यांनी डान्स केला आहे. आणि त्या हृतिक रोशनप्रमाणे नाचतांना दिसत आहे.

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Filmfare (@filmfare)

संबंधित बातम्या