Video Viral: कियारा आडवाणीचा 'जलपरी' वाला अंदाज

गोमंन्तक वृत्तसेवा
सोमवार, 7 जून 2021

इंडस्ट्रीतील ग्लॅमरस अभिनेत्रींच्या यादीमध्ये कियाराचे नाव अव्वल आहे. चाहते कियाराच्या नविन पोस्टची आतुरतेने वाट पहात असतात. अलीकडेच कियारा हिने एक सुंदर व्हिडिओ सोशल मीडियावर(Kiara Advani Video) शेअर केला आहे.

नवी दिल्ली: कबीर सिंह चित्रपटातून आपली खास ओळख निर्माण करणारी अभिनेत्री कियारा अडवाणी(Kiara Advani) हिचे सोशल मीडियावर सध्या चांगलच वर्चस्व दिसतं. नेहमीच सोसल मिडियावर ही अभिनेत्री अॅक्टीव्ह असते. इंडस्ट्रीतील ग्लॅमरस अभिनेत्रींच्या यादीमध्ये कियाराचे नाव अव्वल आहे. चाहते कियाराच्या नविन पोस्टची आतुरतेने वाट पहात असतात. अलीकडेच कियारा हिने एक सुंदर व्हिडिओ सोशल मीडियावर(Kiara Advani Video) शेअर केला आहे, जो तिच्या चाहत्यांना खूप आवडला आहे. अंडरवॉटरमध्ये कियाराची स्टाईल पाहण्यासारखी आहे.(Video Viral Kiara Advani style in Underwater is worth seeing)

आता द फॅमिली मॅन 3; श्रीकांत तिवारी चीनशी लढणार? 

(Kiara Advani Photos) व्हिडिओमध्ये कियाराने निनॉन कलरची बिकिनी परिधान केलेली आहे, यात अभिनेत्रीची ग्लॅमरस स्टाईल दिसत आहे. त्याचबरोबर पाण्याखालील पोहण्याच्या आणि अभिनेत्रीच्या अनोखी शैलीने चाहत्यांना वेड लावलं आहे. हा व्हिडिओ आतापर्यंत 21 लाखाहून अधिक लोकांना पाहिलेला आहे. या अभिनेत्रीच्या व्हिडिओने सोशल मीडियावर चांगल्याच चर्चा रंगल्या आहेत. चाहत्यांसह सेलेब्रिटीजही कियाराचे कौतुक करताना थकत नाहीत. एका युजरने कियाराला 'ओह जलपरी' अशी कमेंटही केली आहे.  तर दुसरीकडे दुसर्‍या युजर्सने लिहिले आहे की, 'कियारा तुझा प्रत्येक लुक वेगळा आहे'.

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by KIARA (@kiaraaliaadvani)

कियाराच्या चित्रपट कारकीर्दीबद्दल बोलताना तिने २०१४ साली 'फुगली' या चित्रपटाद्वारे ग्लॅमर जगतामध्ये तीने प्रवेश केला होता, परंतु 'कबीर सिंह' चित्रपटापासून तिला विशेष ओळख मिळाली. आता ती लवकरच सिद्धार्थ मल्होत्रासमवेत 'शेर शाह' आणि कार्तिक आर्यनसोबत 'भूल भुलैया' चित्रपटात दिसणार आहे. यासह, ती 'जुग-जुग जियो' चित्रपटात आपली उत्कृष्ट कामगिरी दाखवणार आहे. त्याचबरोबर वैयक्तिक आयुष्यातही अभिनेत्री सिद्धार्थ मल्होत्राशी असलेल्या तिच्या संबंधाबद्दल चर्चेत आहे. 

दिलीप कुमार यांची प्रकृती बिघडल्याने रुग्णालयात केले भरती

संबंधित बातम्या