गोव्याच्या क्लबमध्ये राखीने लगावले 'परदेसीया' वर भन्नाट ठुमके; पहा व्हिडिओ

गोमन्तक वृत्तसेवा
शुक्रवार, 2 एप्रिल 2021

बॉलिवूड इंडस्ट्री मध्ये कॉन्ट्रवर्सि क्विन म्हणून ओळखली जाणारी आभिनेत्री राखी सावंत. नेहमीच आपल्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे सोशल मिडियावर ट्रोल होते.व्हिडिओमध्ये ती गोव्यामध्ये धमाल मस्ती करताना एंजॉय करतांना दिसत आहे.

गोवा : बॉलिवूड इंडस्ट्री मध्ये कॉन्ट्रवर्सि क्विन म्हणून ओळखली जाणारी आभिनेत्री राखी सावंत. नेहमीच आपल्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे सोशल मिडियावर ट्रोल होते. नुकत्याच झालेल्या 'बिग बॉसच्या 15'मध्ये राखी टॉप 5 स्पर्धकांपैकी एक होती. बिग बॉसमध्ये राखीने धमाल मस्ती करून प्रेक्षकांच्या मनात आपले विशेष स्थान निर्माण केले आहे. राखी तिच्या बोल्ड, बेधडक आणि हटके अंदाजामुळे नेहमीच चर्चेत असते. तीच्या या हटके अंदाजावर काही फॅन्स फिदा ही आहेत. राखीने सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर केला आहे. आणि या व्हिडिओमध्ये ती गोव्यामध्ये धमाल मस्ती करताना एंजॉय करतांना दिसत आहे.

सध्या राखी गोव्यामध्ये हॉलिडे वेकेशनसाठी गेली आहे. तिने एका क्लबमधला व्हिडिओ शेअर केला आहे. या क्लबमध्ये राखीचं प्रसिध्द आयटम सॉंग 'परदेसीया' वर तीने  भन्नाट ठुमके लगावले आहे.  तसेच 'बिग बॉस 14' मधील मीम सॉंग 'क्या ये सांडनी थी' या गाण्यावर देखील तिने जमके परफॉर्म केला. गोव्यात मज्जा करत आहे. देवाचे धन्यवाद.' असे कॅप्शन या व्हिडिओला राखीने  दिले, त्याच क्लबमध्ये राखीला तिचे अनेक चाहते भेटले. आणि राखीनेही त्याच्यासोबत धमाल केली. 

सुपरस्टार रजनीकांत यांना दादासाहेब फाळके पुरस्कार घोषीत 

राखीला बिग बॉसमुळे प्रचंड लोकप्रियता मिळाली.  शो संपल्यानंतर देखील राखी कोणत्या कोणत्या कारणावरून सतत चर्चेत राहत आहे. आता राखी गोव्यातील क्लबमधील व्हिडिओमुळे पुन्हा चर्चेत आली आहे. गोव्यात चील करायला मिळालं म्हणून तीने देवाचे आभारही मानले आहे. राखीचा हा क्लबमधील व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होताना दिसत आहे. बिग बॉसमध्ये राखीने प्रेक्षकांचे आणि तीच्या चाहत्यांचे भरभरून मनोरंजन केले. 'तवायफ-बजार ए हुस्न' या नव्या वेब सिरीजमधील राखीचा अभिनय पहाण्यासाठी  प्रेक्षकांची उत्सुकता आता वाढली आहे. या नव्या प्रोजेक्टसाठी राखीला नेटकऱ्यांनी शुभेच्छा दिल्या.

संबंधित बातम्या