विद्या बालनच्या ‘शेरनीचे’ नवे गाणे 'मै शेरनी’ जगभरातील महिलांना समर्पित

विद्या बालनच्या ‘शेरनीचे’ नवे गाणे 'मै शेरनी’ जगभरातील महिलांना समर्पित
vidya.jpg

बॉलिवूड (Bollywood) अभिनेत्री विद्या बालनचा (Vidya Balan)  चित्रपट (Movie)  'शेरनी' (sherni) चे एक खास गाणे (song) रिलीज (Release) झाले आहे.विद्या बालन चा 'शेरनी ' हा चित्रपट १८ जून ला अमॅझॉन प्राईम (Amazon Prime) व्हिडिओ वर येणार आहे. विद्याने नेहमीच प्रेक्षकांना काहीतरी नवीन दिले आहे, कथांमध्ये काही आश्चर्यकारक कामगिरी विद्याने केली आहे. विद्याचा चित्रपट येण्याआधी  अमॅझॉन प्राईमने शेरनी हे गाणं प्रदर्शित केलं आहे. (Vidya Balans new song Mai Sherani is dedicated to all women over the world)

वाघिणीसाठी स्त्रियांना गर्जना करण्याची गरज नाही

या गाण्याबद्दल विद्या बालन म्हणते कि -‘मैं शेरनी’ म्युझिक व्हिडिओद्वारे जगातील सर्व महिलांना आमची श्रद्धांजली आहे ज्यांना कधीही हार मानण्याची अटळ भावना आहे. शेरनी  आमच्या सर्वांसाठी खास आहे आणि या चित्रपटाचा आणि म्युझिक व्हिडीओच्या सहाय्याने आम्ही अशा महिलांचा उत्सव साजरा करीत आहोत ज्यांनी आम्हाला दाखवून दिले आहे की एक स्त्री करू शकत नाही असे काही नाही. चित्रपटातील तिच्या भूमिकेबद्दल विद्या म्हणाली की माझे पात्र विद्या व्हिन्सेंटसारखे आहे. आम्हाला हे दर्शवायचे आहे की महिला निर्भय आणि सामर्थ्यवान आहेत आणि आपल्याला वाघीण  म्हणून गर्जना करण्याची आवश्यकता नाही. आम्ही ही भावना या गाण्यामध्ये टिपण्याचा प्रयत्न केला आहे. 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Vidya Balan (@balanvidya)

'शेरनी' चित्रपटात विद्या एका प्रामाणिक वनविभागाच्या अधिकाऱ्याची भूमिका साकारताना दिसणार आहे. विद्या बालनबरोबर मुकुल चड्ढा, विजय राज, इला अरुण, ब्रिजेंद्र कला आणि नीरज कबी हे असणार आहेत.शेरनी या गाण्याला विद्याच्या चाहत्यांनी चांगलीच पसंती  दिली आहे. राघव लिखित-‘मैं शेरनी’ हे गाणे उत्कर्ष धोटेकर यांनी कंपोज (Compose) केले आहे. हे गाणे 15 जूनपासून सर्व म्युझिक प्लॅटफॉर्मवर - अ‍ॅमेझॉन प्राइम म्युझिक, स्पॉटिफाई, गायना, सावन, विंक इत्यादींवर प्रवाहित केले गेले.

No stories found.
Dainik Gomantak
www.dainikgomantak.com