
अभिनेता विजय सेतूपतीचा एक फोटो सध्या सोशल मिडीयावर व्हायरल होत आहे. शाहरुख खानची मुख्य भूमीका असलेला जवान सध्या बॉक्स ऑफिसवर जोरदार मुसंडी मारत आहे.
अवघ्या 9 दिवसांत चित्रपटाने 700 कोटींची कमाई केल्याने सगळ्यांनाच आश्चर्याचा धक्का बसला आहे. जवानच्या याच यशाचे सेलिब्रेशन करण्यासाठी चित्रपटाचे कलाकार एकत्र आले होते. चला पाहुया सविस्तर वृत्त.
अॅटली दिग्दर्शित शाहरुख खानचा 'जवान' हा चित्रपट 7 सप्टेंबरला रिलीज झाला आणि पहिल्या दिवसापासून चित्रपटाने तुफान कमाई करायला सुरूवात केली.
पहिल्या दिवशी चित्रपटाने 127 कोटींची कमाई केल्यानंतर चित्रपटाच्या पुढच्या दिवसांच्या कमाईचा एकूण अंदाज आला होता.
चित्रपटाने केलेली कमाई पाहता सेलिब्रेशन होणं स्वाभाविक आहे. जवानच्या अशाच एका सेलिब्रेशनला चित्रपटाचा दिग्दर्शक अॅटली, 'जवान'चा मुख्य खलनायक विजय सेतुपती उपस्थित होते. या सेलिब्रेशनवेळी विजयच्या साध्या लूकची खूप चर्चा झाली.
यावेळी अॅटली चमकदार कोट आणि पॅंट अशा लूकमध्ये दिसला ;पण स्टेजवर बसलेला विजय सेतुपती पूर्णपणे साध्या लूकमध्ये दिसला.
जवान कार्यक्रमाचे अनेक फोटो सोशल मीडियावर समोर आले आहेत. विजय सेतुपतीने चप्पल घातल्याने चाहत्यांचे पटकन लक्ष गेले . विजयच्या साधेपणाने अनेकांची मने जिंकली.
विजयने निळा शर्ट आणि खाकी पॅन्ट घातली होती आणि हिरवी चप्पल घातली होती. फोटो पाहून चाहत्यांनी या विजयचे कौतुक करायला सुरुवात केली.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, विजय सेतुपतीने अॅटलीच्या 'जवान' चित्रपटासाठी 21 कोटी इतके मानधन घेतले होते. तर नयनताराने 10 कोटी इतके मानधन घेतले. या चित्रपटात शाहरुख खानसोबत संघर्ष करणाऱ्या विजय सेतुपतीने अवैध शस्त्रास्त्र व्यापारी कालीची भूमिका साकारली आहे.