Thalapathy Vijay: थलापती विजयच्या 'वरिसु' चा फर्स्ट लूक रिलीज

Varisu First Look Out: थलापती विजयचा आगामी 'वरिसु' चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
Thalapathy Vijay: थलापती विजयच्या 'वरिसु' चा फर्स्ट लूक रिलीज
Thalapathy VijayDainik Gomantak

दाक्षिणात्य सिनेसृष्टीतील लोकप्रिय अभिनेता थलापती विजयचा (Thalapathy Vijay) 'वरिसु' (Varisu) हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. नुकतेच थलापती विजयने या चित्रपटाचे पोस्टर सोशल मीडियावर शेअर केले आहे. थलापती विजयचा नुकताच 'बीस्ट' (Beast) हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. पण बॉक्स ऑफिसवर या चित्रपटाची चांगली कमाई करू शकला नाही. पण 'वरिसु' चित्रपट मात्र प्रेक्षकांच्या पसंतीस उतरेल असे बोलले जात आहे.

'वरिसु' या चित्रपटामध्ये प्रेक्षकांना थलापती विजय (Thalapathy Vijay) आणि रश्मिका मंदानाची (Rashmika Mandanna) जोडी पाहायला मिळणार आहे. या चित्रपटचे शूटिंग अद्याप पूर्ण झालेलं नाही. चित्रपटात विजय आणि रश्मिका याशिवाय प्रभू, सरथ कुमार, प्रकाश राज, जयसुधा, श्रीकांत, शाम, योगी बाबू, संगीता आणि संयुक्तादेखील मुख्य भूमिकेत दिसणार आहे.

Thalapathy Vijay
MS धोनी क्रिकेटनंतर आता दाखवणार चित्रपटांमध्ये आपली कमाल

'वरिसु' या चित्रपटाच्या दिग्दर्शन वामशी पेडिपल्ली करत आहेत. तर या चित्रपटाची कथा वामशी पेडिपल्ली यांच्यासह लेखक हरी आणि आशिशोर यांनी लिहिली आहे. हा बिग बजेट चित्रपट 2023 च्या पोंगलमध्ये प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com