HBD Vijay Sethupathy : टेलिफोन बूथवर काम करण्यापासुन ते सुपरस्टार होण्यापर्यंतचा विजय सेतुपतीचा प्रवास...

आज दक्षिणेच्या चित्रपटांत सुपरस्टार बनलेल्या विजय सेतुपती एकेकाळी अत्यंत संघर्षाचं आयुष्य जगत होता
Vijay Sethupathy
Vijay SethupathyDainik Gomantak

HBD Vijay Sethupathy आपल्या वास्तववादी अभिनयाच्या जोरावर साऊथसह देशभरातल्या चित्रपट रसिकांच्या हृदयावर आपलं नाव कोरणारा अभिनेता विजय सेतुपती आज 45 वर्षांचा झाला आहे.

आजच्या विशेष दिवशी तमिळ स्टार विजय सेतुपतीच्या (Vijay Sethupathy) संघर्षाची गोष्ट चला जाणुन घेऊया. नॉन-फिल्मी बॅकग्राउंडचा असताना वेगळ्या भूमीका करून विजय सेतुपतीने ज्या प्रकारे चित्रपटसृष्टीत आपलं स्थान पक्कं केलं त्याचं खरंच कौतुक करायला हवं. आज तो तामिळमधला सर्वात जास्त मानधन घेणाऱ्या कलाकारांमधला एक आहे.

एखादी गोष्ट मनापासून मागितली किंवा त्यासाठी जीव तोडुन मेहनत केली कि ती गोष्ट तुम्हाला मिळतेच हे वाक्य पुस्तकी अजिबात नाही. आणि हे सिद्ध करुन दाखवलं आहे तमिळ सुपरस्टार विजय सेतुपतीने. 

सामान्य माणसाच्या मधला एक सामान्य माणूस- ज्युनियर आर्टिस्ट ते तामिळ चित्रपटांचा सुपरस्टार कसा बनला? ही कथा तुम्हाला नक्कीच आवडेल. एखादी गोष्ट मिळवण्यासाठी गरजेची असणारी कठोर परिश्रम आणि जिद्द असेल तर ती तुम्हाला कुणीही अडवू शकणार नाही हे नक्की.

आज एवढं नाव मिळवलेला हा अभिनेता आयुष्यात अनेक नकार पचवून इथंपर्यंत आला आहे. अपमान,नकार, टोमणे अशा कित्येक गोष्टी विजयच्या यशात त्याचे जोडीदार बनुन उभ्या होत्या. आज विजय सेतुपतीचा 45 वा वाढदिवस आहे. 

आज सोमवारच्या मोटिव्हेशन मालिकेत आम्ही विजय सेतुपतीच्या या प्रेरणादायी प्रवासाबद्दल सांगत आहोत. विजय सेतुपती हे सुरुवातीपासूनच अभ्यासात खूपच कमकुवत होते.

 विजय सेतुपतीने इकडे तिकडे भटकण्यापेक्षा अभ्यासावर लक्ष केंद्रित करावे आणि नंतर नोकरी करावी अशी वडिलांची इच्छा होती. पण विजय सेतुपतीच्या चंचल मनाने त्याला काय करावे हे समजत नव्हते. पण कुटुंबाचाही आधार घ्यावा लागला. अशा परिस्थितीत विजय सेतुपती यांनी सर्व प्रकारची छोटी कामे केली.

विजय सेतुपती कधी पॉकेटमनी साठी कॅशियर म्हणून काम करत असे तर कधी फोन बूथ ऑपरेटर देखील होता. काही काळ त्याने सेल्समन म्हणूनही काम केले. या कामांसोबतच विजय सेतुपतीचा अभ्यास सुरूच होता पुढे त्याने वाणिज्य शाखेत पदवी संपादन केली.

 विजय सेतुपती यांच्या कुटुंबाची आर्थिक परिस्थिती फारशी चांगली नव्हती. त्याला धाकट्या भाऊ-बहिणींचाही आधार घ्यावा लागला. त्यामुळे विजय सेतुपती यांना कॉलेजनंतर अकौंटंटची नोकरी मिळाली आणि काही काळानंतर ते दुबईला गेले. 

विजय सेतुपती दुबईत भारतापेक्षा चारपट कमावत होता, पण त्याचे मन समाधानी नव्हते. त्यामुळे तो 2003 मध्ये भारतात परतला. इथं त्यांने इंटिरिअर डिझाईनचं काम करायला सुरुवात केली. काही काळ त्याने मार्केटिंगचंही काम केलं.पण अभिनेता बनण्याचं वेड त्याला शांत बसू देत नव्हतं

विजय सेतुपतीचं अभिनेता होण्याचं इतके वेड होते की त्यांनी टीव्ही मालिकांमध्ये काम करण्याचा निर्णय घेतला. विजय सेतुपती यांनी टीव्ही मालिकांमध्ये काम करण्याव्यतिरिक्त बॅकग्राउंड डान्सर आणि चित्रपटांमध्ये ज्युनिअर आर्टिस्ट म्हणुनही काम केले.

अभिनेता होण्यासाठी त्यांची धडपड काही वर्षे सुरूच होती. पण 2012 मध्ये विजय सेतुपतीच्या कारकिर्दीला पूर्णपणे कलाटणी मिळाली. त्या वर्षी त्यांचे तीन चित्रपट प्रदर्शित झाले तेव्हा ते सुपरहिट झाले होते. 

Vijay Sethupathy
Rafta Rafta Trailor Release :भुवन बाम- सृष्टी गांगुलीच्या आगामी शो 'रफ्ता रफ्ता'चा टीजर रिलीज..

2011 मध्ये विजय सेतुपती यांना त्यांच्या करिअरमधील पहिली मुख्य भूमिका मिळाली. त्यानंतर तो 'थेनमेरकु पारुवकात्रु'मध्ये दिसला. त्या वर्षी या चित्रपटाला तीन राष्ट्रीय पुरस्कार मिळाले. 

तेव्हापासून विजय सेतुपतीचे प्रदर्शित झालेले बहुतेक चित्रपट हिट ठरले आहेत. या चित्रपटांमुळे विजय सेतुपती तामिळ चित्रपटसृष्टीतील सर्वाधिक मानधन घेणारा अभिनेता ठरला.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com