आलिया भट विजयची वर्माची जबरा फॅन!

आलिया भट विजयची वर्माची जबरा फॅन!
Vijay Verma announced that he is working with Alia Bhatt for the film Darlings

मुंबई: अभिनेता विजय वर्मा याने एक से बढकर एक भूमिका साकारत प्रेक्षकांबरोबरच समीक्षकांचीही शाबासकी मिळवली आहे. त्याचा चाहतावर्ग खूप मोठा आहे. अलीकडेच त्याने आलिया भट्टसोबत करत असलेल्या ‘डार्लिंग्ज’ चित्रपटाची घोषणा केली. याआधी आलिया आणि विजय यांनी ‘गल्ली बॉय’ चित्रपटात एकत्र काम केले आहे. दोघांचा हा दुसरा एकत्र चित्रपट. ‘गल्ली बॉय’मध्ये काम करताना आलिया विजयच्या अभिनयावर फिदा झाली होती.

एकदा तरी आपण विजयसोबत प्रमुख भूमिकेत झळकायला हवेच, असे तिने तेव्हाच मनाशी पक्के केले होते. म्हणूनच तिने ‘डार्लिंग्ज’साठी विजयच्या नावाची शिफारस केली. तीच चित्रपटाची सहनिर्माती असल्याने इतर क्रू मेंबर्सनीही तिच्या मागणीला लगलीच संमती दिली. ‘डार्लिंग्ज’ डार्क कॉमेडी जॉनरचा चित्रपट आहे. त्यात आलिया आणि विजय यांची जोडी प्रथमच लीड रोलमध्ये असल्याने दोघांचे चाहते खूप खूश आहेत.

डार्लिगस नुकतीच रेड चिलीजने डार्क कॉमेडी म्हणून घोषित केले होते आणि आलिया भट्ट आणि विजय वर्मा या दोन प्रतिभावान तारे पडद्यावर पहिल्यांदा एकत्र पाहण्यास चाहते उत्सुक आहेत. 'गल्ली बॉय' मधील मोईनच्या भूमिकेतल्या शानदार अभिनयापासून विजय प्रसिद्धीस आला आहे, म्हणूनच तो शी, मिझरपूर २, अ सूटबेल बॉय, घोस्ट स्टोरीज, बाघी 3 या प्रोजेक्ट्साठी काम करू शकला.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak
www.dainikgomantak.com