Vikram Gokhale Rumor of the Death: विक्रम गोखलेंचं निधन ही अफवा; पत्नीसह मुलीचा खुलासा

Vikram Gokhle Health Update: बॉलिवूड अभिनेता विक्रम गोखले जीवन आणि मृत्यू यांच्यात झुलत आहे
Vikram Gokhle Health Update
Vikram Gokhle Health Updatedainik Gomantak

हिंदी आणि मराठी इंडस्ट्रीतील अतिशय प्रसिद्ध अभिनेते विक्रम गोखले यांच्या निधनाची बातमी सर्वत्र पसरली आहे. पण त्यांची मुलगी नेहा गोखले आणि त्यांच्या पत्नी वृषाली गोखले यांनी सांगितले की, विक्रम गोखलेंचं निधन ही अफवा आहे.

विक्रम गोखलेंची (Vikram Gokhale) प्रकृती गंभीर असून त्यांच्या मृत्यूची बातमी निव्वळ अफवा आहे. असे त्यांच्या पत्नी वृषाली गोखले यांनी सांगितले की, "ते काल दुपारी कोमात गेले होते आणि तेव्हापासून ते काहीच प्रतिसाद देत नाहीत. ते व्हेंटिलेटरवर आहेत. उद्या सकाळी काय करायचे ते डॉक्टर ठरवतील. यावर सर्व काही अवलंबून आहे. "त्यांच्यात सुधारणा होते आहे की नाही. प्रतिसाद देत आहे."

तर त्यांची मुलगी नेहा गोखले हिने सांगितले की, 'विक्रम गोखले यांची प्रकृती खालावल्याने त्यांना पुण्यातील पंडित दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटलच्या आयसीयूमध्ये दाखल करण्यात आले आहे,ते व्हेंटिलेटरवर आहेत.'

गेल्या 15 दिवसांपासून गोखलेंवर पुण्यातील दिनानाथ मंगेशकर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. रुग्णालयात उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवल्याच्या बातम्या सोशल मीडियावर (Social Media) व्हायरल झाल्यानंतर कुटुंबियांनी या अफवा असल्याचं म्हटलं आहे. त्यांच्या निधनाच्या वृत्त सोशल मीडियावर पसरल्यानंतर बॉलिवूड कलाकारांनी ट्विटरवरुन पोस्ट केल्याने विक्रम गोखले हे सोशल मीडियावर चर्चेत आले आहे.

 त्यांनी मराठी सिनेसृष्टीबरोबरच अनेक हिंदी चित्रपटसृष्टीतही एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. 'भूल भुलैया', 'ट्राफिक', 'हिचकी' 'आमी बोलतो मराठी', 'लपंडाव', 'कळत नकळत', 'गोदावरी', 'एबी आणि सीडी', 'प्रवास' आणि 'नटसम्राट' यासारख्या चित्रपटांचा समावेश आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com