'लॅंड करा दे भाई' आठवला का! आलिया भट्टने व्हिडीओ मध्ये आणला नवा ट्विस्ट

या व्हिडिओने सोशल मीडियावर धुमाकूळ घातला आणि आता विपिन कुमारने आलिया भट्टसोबत एका जाहिरातीत काम केले.
'लॅंड करा दे भाई' आठवला का! आलिया भट्टने व्हिडीओ मध्ये आणला नवा ट्विस्ट
Alia BhattDainik Gomantak

सोशल मीडियावर 'लॅंड करा दे भाई'चा व्हायरल झालेला व्हिडिओ तुम्हाला आठवत असेलच. या व्हिडिओमध्ये एक व्यक्ती पॅराग्लायडिंग करताना दिसत होता. विपिन कुमार नावाचा हा व्यक्ती पॅराग्लायडिंग वेळी ओरडताना आणि घाबरताना दिसत होता. विपिन वारंवार ओरडत होता आणि त्याच्या साथीदाराला सांगत होता की, 200 रुपये जास्त घेतले तरी पण मला जमिनीवर उतरव. यासोबतच विपिन स्वत:ला शिव्या देतानाही व्हिडीओमध्ये दिसून येत होता. या व्हिडिओने सोशल मीडियावर धुमाकूळ घातला आणि आता विपिन कुमारने आलिया भट्टसोबत (Alia Bhatt) एका जाहिरातीत काम केले. (Vipin Kumar whose video has caused a stir on social media is working with Alia Bhatt in an advertisement)

Alia Bhatt
Hari Har Song: 'पृथ्वीराज' सम्राटाची गाथा सांगणार पहिलं गाणं 'हरी हर' रिलीज

आलियाने मीम व्हिडिओ पुन्हा केला तयार

विपिनने आलिया भट्टसोबत त्याचा पॅराग्लायडिंगचा व्हायरल व्हिडिओ रिक्रिएट केला आहे. या व्हिडिओमध्ये विपिनचा सहकारी पॅराग्लायडर आलिया भट्ट आहे. विपिन पूर्वीप्रमाणेच आकाशात उडताना घाबरून खाली उतरण्याची मागणी करत असून तो राईडला घाबरत आहे. त्याच वेळी, आलिया पूर्णपणे शांत आहे आणि शांतपणे त्याला पाहत आहे. यानंतर आलिया स्वतः पर्क चॉकलेट खाताना दिसते आणि नंतर ती ते विपिनला देते आणि मग विपिनही शांत होतो.

हा व्हिडिओ शेअर करत विपिनने कॅप्शन लिहिले की, 'कोण म्हणाले की एक मीम तुमची प्रगती करु शकत नाही? कोण म्हणते की मीमचे आयुष्य फक्त एक ते दोन महिने असते? हा सर्व मूर्खपणाचा स्टिरियोटाइप मोडून टाकून मी आलिया भट्टसोबत शूट केले. या व्हिडिओला यूजर्स कडून खूप पसंती मिळत आहे. चाहत्यांनी आलिया आणि विपिनचे कौतुक केले आहे. तसेच त्याला BTS शेअर करण्यास सांगितले आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.