Viral Video: पाहा प्रपोज करण्याचा खास अंदाज

गोमंन्तक वृत्तसेवा
बुधवार, 12 मे 2021

हा व्हिडिओ ट्विटरवर ''Fred Schultz'' नावाच्या अकाऊंटवर शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओसह अतिशय मजेदार कॅप्शन देखील दिले गेले आहेत. आता हा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे आणि पाच लाखाहून अधिक लोकांनी हा व्हिडिओ पाहिला आहे.

Viral Video: सोशल मीडियावर(Social Media) नेहमीच काही ना काही कारणावरून व्हिडिओ(Video) व्हायरल(Viral) होत असतात. त्यातील काही व्हिडिओ हसवतात तर काही रडविणारे असतात तर धक्कादायक असतात. त्याच वेळी, काही व्हिडिओ लोकांना मोठा धडा देणारे. सध्या सोशल मिडियावर असाच एक व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे, तो पाहिल्यानंतर तुम्हीसुद्धा हसून आश्चर्यचकित व्हाल. कारण या व्हडिओमध्ये प्रपोज(Propose) करण्याचा अनोखा अोदाज आपल्याला पाहायला मिळणार आहे. लोक हा बघून आश्चर्यचकित झाले आहे. या व्हिडिओची सोशल मीडियावर जोरदार चर्चा होत आहे आणि कमेंट्सच्या माध्यमातून लोक त्याचा आनंद लुटत आहेत.

रेखा अन् इम्रान खानची अधूरी एक कहाणी, वाचा रंजक किस्सा 

आपल्या सर्वांना माहित आहे की लोक प्रपोज करण्याच्या वेगवेगळ्या पद्धती वापरतात. नवनविन कल्पना सुचवतात, काह खास प्लॅनिंगही करतात. काही लोकांचे प्रपोज करण्याचे किस्से पाहून छान वाटते, तर काही पाहून आश्चर्य वाटले. सोशल मीडियावरही बर्‍याच वेळा असे व्हिडिओ शेअर केले जातात. परंतु, आता ज्या लोकांचा हा प्रपोज करण्याचा व्हिडिओ शेअर केलाय त्यांना बघून लोकांचं हसू थांबत नाहीये. आपण व्हिडिओमध्ये पाहू शकता. एक माणूस त्याच्या प्रेयसीला समुद्रकिनार्यावर प्रपोज करण्यासाठी घेऊन जातो. तिथे एक छायाचित्रकार देखील आहे. हे कपल  समुद्र किनाऱ्याकडे जातानाचे हे दृश्य खूपच मजेशीर आहे. फोटोग्राउर फोटो काढतांना  बऱ्याचदा पडतो आणि तो व्यक्ती आपल्या मैत्रिणीला अतिशय मजेदार पद्धतीने प्रपोज करतांना दिसत आहे.

ईशा अंबानीसाठी डिझाइनरने सोन्यापासून तयार केला खास लेहंगा

हा व्हिडिओ पाहून प्रत्येकाला मजा आली आली आहे. सोशल मीडियाच्या ट्विटरवर प्लॅटफॉर्म  हा व्हिडिओ 'फ्रेड स्ल्ट्झ' नावाच्या अकाऊंटवर शेअर केला गेला आहे. व्हिडिओसह अतिशय मजेदार कॅप्शन देखील लिहिले गेले आहेत. आता हा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे आतापर्यंत हा व्हिडिओ 12 हजार लोकांना आवडला आहे. एवढेच नाही तर लोक व्हिडिओवर बऱ्याच कमेंट्स देखील करीत आहेत.
 

संबंधित बातम्या