विराट-अनुष्काने प्रायव्हसी दिल्याबद्दल फोटोग्राफर्सचे मानले आभार

गोमंन्तक वृत्तसेवा
गुरुवार, 21 जानेवारी 2021

या फोटोतील विशेष आकर्षण म्हणजे यावेळी विराट कोहलीच्या अनोख्या हेअरस्टाइलने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. भारतीय संघाचा विराट कोहली क्रिकेटसोबतच त्याच्या लूकमुळेही चाहत्यांमध्ये प्रिय आहे.

मुंबई: टीम इंडियाचा धडाकेबाज कर्णधार विराट कोहलीच्या घरी चिमुकल्या मुलीचं आगमन झालं आहे. विराटची पत्नी अभिनेत्री अनुष्का शर्माने सोमवारी 11 जानेवरीला मुलीला जन्म दिला. 'आज दुपारी आमच्या मुलीचा जन्म झाला,' असे ट्विट करत त्यांनी सोशल मिडियावरून ही बातमी दिली होती.

मध्यंतरी फोटोग्राफर्सना विराट आणि अनुष्का दोघांनीही आमच्या वैयक्तिक आयुष्यात लुडबूड करू नका अशी विनंती केली होती. त्यानंतर विराट आणि अनुष्का पहिल्यांदाच मीडियासमोर आले आहेत.

एका गोड मुलीचे पालक झाल्यानंतर पहिल्यांदाच विराट कोहली आणि अनुष्का शर्मा मीडियासमोर आले आहे. मुंबईतील दवाखान्यातून बाहेर आल्यानंतर दोघांनीही फोटोग्राफर्सना वेळ दिला आहे.

“आंम्हाला ही आयुष्यातील सुंदर गोष्ट अनुभवता आली. यावेळी आंम्हाला आता प्रायव्हसी पाहिजे आहे, हे तुम्ही नक्कीच समजून घेवू शकता असं आम्ही समजतो,” अशी पोस्टही अनुष्काने केली होती.

विराट कोहली आणि अनुष्का शर्माने त्यांच्या बाळाचा फोटो काढू नका अशी फोटोग्राफर्सना विनंती केली होती. मुलीच्या जन्मानंतर त्यांना थोडी प्रायव्हसी हवी असे तीने सांगितले होते. काही काळानंतर आम्ही तूम्हाला हवी ती माहिती देवू असेही अनुष्काने म्हटले होते. यावेळी मीडियासमोर येवून अनुष्काने प्रायव्हसी दिल्याबद्दल आवर्जून फोटोग्राफर्सचे आभार मानले.

या फोटोतील विशेष आकर्षण म्हणजे यावेळी विराट कोहलीच्या अनोख्या हेअरस्टाइलने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. भारतीय संघाचा विराट कोहली क्रिकेटसोबतच त्याच्या लूकमुळेही चाहत्यांमध्ये प्रिय आहे. सध्या त्याची ही नवी हेअरस्टाइल चाहत्यांच्या चर्चेत आहे. आणि सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे.

 

 

 

 

 

संबंधित बातम्या