विराट अनुष्का म्हणाले, आमच्या मुलीचे फोटो काढू नका

गोमन्तक वृत्तसेवा
गुरुवार, 14 जानेवारी 2021

विराट कोहली आणि अनुष्काने त्यांच्या मुलीचे फोटो काढू नये ही विनंती फोटोग्राफरला केली आहे.

मुंबई: बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्मा आणि क्रिकेटपटू विराट कोहली यांच्या घरी सोमवारी म्हणजेच ११ जानेवारी रोजी एका छोट्या परीचे आगमन झाले आहे. अनेकांना ही गोड बातमी कळताच सोशल मीडिया पोस्टद्वारे शुभेच्छांचा वर्षाव झाला. दरम्यान विराट कोहली आणि अनुष्काने त्यांच्या मुलीचे फोटो काढू नये ही विनंती फोटोग्राफरला केली आहे.

अनुष्का शर्मा आणि विराट कोहनीने फोटोग्राफर्ससाठी एक नोट लिहिली. ज्या नोटमध्ये त्यांनी फोटोग्राफर्सने त्यांच्या मुलीचे फोटो काढू नये असे म्हटले आहे. ‘आई-वडिल म्हणून आम्ही तुम्हाला विनंती करतो. आमच्या मुलीचे कोणीही फोटो काढू नका. कृपया आम्हाला सहकार्य करा’ असे त्यांनी त्या नोटमध्ये म्हटले आहे.

पुढे नोटमध्ये लिहीतांना  विराट आणि अनुष्काने योग्य वेळ येताच मुलीचे फोटो शेअर करु असे म्हटले आहे. ‘तुम्हाला हवी असलेली पूर्ण माहिती आम्ही तुम्हाला नक्की देऊ. पण आमच्या मुलीशी संबंधीत कुठलीही माहिती देऊ कींवा घेऊ नका. आम्हाला विश्वास आहे की तुम्ही आम्हाला समजून घ्याल’ असे त्या नोटमध्ये विरुष्काने  म्हटले आहे.

 

संबंधित बातम्या