Anushka Sharma-Virat Kohli: अनुष्का-विराटने घेतले ‘महाकालेश्वराचे’ दर्शन, विवेक अग्निहोत्रींचे खोचक ट्वीट; म्हणाले...

विराट आणि अनुष्का यांनी महाकालेश्वराचे दर्शन घेतल्याचे अनेक फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाले आहे.
Anushka Sharma-Virat Kohli:
Anushka Sharma-Virat Kohli:Dainik Gomantak

Anushka Sharma-Virat Kohli Mahakaleshwar Darshan: बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्मा आणि भारतीय क्रिकेटपटू विराट कोहली यांनी नुकतेच उज्जैनमधील महाकालेश्वराचे दर्शन घेतले.

महाकालेश्वर मंदिरात पूजा करतानांचे अनेक व्हिडीओ आणि फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाले आहेत. यावर आता बॉलिवूडमधून देखील काही प्रतिक्रिया येत आहेत. ‘द काश्मीर फाईल्स’ फेम दिग्दर्शक विवेक रंजन अग्निहोत्री यांनीही आपली प्रतिक्रिया दिली आहे. विराट-अनुष्का यांचा एक व्हिडीओ शेअर करत विबेक अग्निहोत्री यांनी एक खोचक ट्वीट केले आहे.

विराट आणि अनुष्का यांनी महाकालेश्वराचे दर्शन घेतले आहे. त्यांचे अनेक फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहेत. चाहते या फोटो आणि व्हिडीओंवर कमेंटचा वर्षाव करत आहेत. दरम्यान, विवेक रंजन अग्निहोत्री यांनी केलेले हे ट्वीट मात्र विराट-अनुष्काच्या चाहत्यांच्या पचनी पडणारा नाही. वेळेनुसार लोक बदलतात, असे म्हणत त्यांनी एक ट्वीट केले आहे.

काही महिन्यापुर्वी विराटचा एक व्हिडीओ व्हायरल झाला होता. या व्हिडीओ विराट म्हाणाला होता की ‘मी काय पूजा पाठ करणाऱ्यांसारखा दिसतो का?’, याचाच उल्लेख करत विवेक अग्निहोत्री यांनी हे ट्वीट शेअर केले आहे.

विवेक अग्निहोत्री (Vivek Agnihotri) यांनी लिहिले की, ‘मला आजही आठवत की, काही सोशल मीडिया युजर्सनी विराट कोहलीला तेव्हा ट्रोल केले होते, जेव्हा त्याने गंमतीत म्हटले होते की, ‘मी काय पूजा पाठ करणाऱ्यांसारखा दिसतो का?’ पण लोक बदलतात, ही चांगली गोष्ट आहे. परिवर्तन सार्थक जीवनाचे दुसरे नाव आहे.’

अनुष्का शर्मा आणि विराट कोहली उज्जैनच्या महाकालेश्वर मंदिरात पोहोचले होते. पहाटे चार वाजता होणाऱ्या महाकाल भस्म आरतीत ही त्यांनी हजेरी लावली होती. दोघांनी भगवान शंकराची मनोभावे पूजा केली. यावेळी अनुष्का शर्माने गुलाबी रंगाची साडी परिधान केली होती. तर, विराट कोहली याने गळ्यात रुद्राक्षाच्या माळा आणि कपाळावर चंदन टिळा लावला होता. तर, धोती आणि बनियान परिधान करून त्याने या पूजेत सहभागी झाला होता.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
logo
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com