'द वॅक्सीन वॉर'चा फर्स्ट लूक रिलीज...नाना पाटेकर, पल्लवी जोशीसह अनेक कलाकार नव्या भूमीकेत

दिग्दर्शक विवेक अग्नीहोत्री यांचा बहुचर्चित चित्रपट 'द वॅक्सी वॉर'चा फर्स्ट लूक रिलीज झाला आहे.
Vivek Agnihotri
Vivek AgnihotriDainik Gomantak

The Vaccine War first look : द कश्मिर फाईल्स फेम दिग्दर्शक विवेक अग्नीहोत्री दिग्दर्शित द वॅक्सीन वॉर चित्रपटाची गेल्या काही दिवसांपासून मनोरंजन विश्वात जोरदार चर्चा सुरू आहे.

कोवीडच्या काळात भारताने लसीच्या संशोधनासाठी आणि अभ्यासासाठी केलेल्या प्रयत्नांवर आधारित हा चित्रपट लवकरच थिएटर्समध्ये दाखल होणार आहे.

द कश्मिर फाईल्सनंतर आता द वॅक्सीन वॉर

सध्या विवेक अग्निहोत्री दिग्दर्शित 'द व्हॅक्सिन वॉर' हा चित्रपटाची जोरदार चर्चा सुरू आहे. चित्रपटाची चर्चा होण्याचे कारण म्हणजे नुकताच चित्रपटाचं फर्स्ट पोस्टर रिलीज झालं आहे.

 इंडिया फॉर ह्युमॅनिटी टूरचा एक भाग म्हणून या वॅक्सीन वॉरच्या मेकर्सनी अमेरिकेमध्ये चित्रपटाचं स्पेशल स्क्रीनिंग आयोजित केले होते. 

विवेक अग्नीहोत्रींनी शेअर केला फर्स्ट लूक

'द काश्मीर फाइल्स'नंतर आता 'द व्हॅक्सिन वॉर'बद्दल प्रेक्षकांमध्ये उत्साह आहे.चाहत्यांची उत्सुकता अजुन ताणत आता दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री यांनी चित्रपटाचा फर्स्ट लूक पोस्टर रिलीज केला आहे.

विवेक अग्नीहोत्रींची कॅप्शन

सोशल मीडियावर चित्रपटाचे पहिले पोस्टर रिलीझ करताना, विवेक अग्निहोत्री यांनी कॅप्शनमध्ये लिहिले, "प्रेझेंटेशन - 28 सप्टेंबर 2023 रोजी जगभरात प्रदर्शित होणार्‍या भारतातील पहिल्या जैव-विज्ञान चित्रपट द व्हॅक्सिन वॉरचा फर्स्ट लूक."

या कलाकारांची झलक

पोस्टरचा फर्स्ट लूकमध्ये अनुपम खेर, नाना पाटेकर, रायमा सेन, पल्लवी जोशी, सप्तमी गौडा, निवेदिता भट्टाचार्य, गिरीजा ओक गोडबोले आणि मोहन कपूर यांचा समावेश असलेल्या चित्रपटाच्या स्टार कास्टची एक झलक दाखवण्यात आली आहे.

पोस्टरमध्ये दिसतं

पोस्टरमध्ये चिंताजनक परिस्थिती मांडण्यात आली असून त्यात कलाकारांनी तणावपूर्ण परिस्थितीचे चित्रण केले आहे. 

सप्तमी गौडा हिने डॉक्टरांचा अॅप्रन घातला आहे, ज्यामुळे ती 'द व्हॅक्सिन वॉर' मध्ये कोणती भूमिका साकारणार आहे याचा एक सिग्नल मिळाला आहे. 

या पोस्टरमध्ये रायमा सेन साडीत दिसली. पोस्टरमध्ये फेस मास्क घातलेल्या आणि हातात ट्रे धरलेल्या परिचारिकासह एक COVID-19 लसीची बाटली देखील दर्शविली आहे.

Vivek Agnihotri
शाहरुखच्या 'जवान'ची मुंबई पोलिसाला भुरळ, चलेया गाण्यावरचा डान्स व्हिडीओ व्हायरल

लस संशोधनाची गोष्ट

या चित्रपटात भारत बायोटेक आणि इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चद्वारे सह-लस (COVAXIN) तयार करण्याचा प्रवास दाखविण्यात आला आहे. 

पल्लवी जोशी, अनुपम खेर, नाना पाटेकर आणि रायमा सेन यांच्या प्रमुख भूमिका असलेला हा चित्रपट 28 सप्टेंबरला चित्रपटगृहात दाखल होणार आहे. पल्लवी जोशी द वॅक्सीन वॉरचे दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री यांची पत्नी आहे.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com