बायको सोबत बाईक रायडिंग करणे विवेक ओबेरॉयला पडले महागात

गोमन्तक वृत्तसेवा
शनिवार, 20 फेब्रुवारी 2021

बॉलिवूड अभिनेता विवेक ओबेरॉयचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे, ज्यामध्ये तो आपल्या बायकोला दुचाकीवरून फिरवतांना दिसत आहे.

नवी दिल्ली:  बॉलिवूड अभिनेता विवेक ओबेरॉयचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे, ज्यामध्ये तो आपल्या बायकोला दुचाकीवरून फिरवतांना दिसत आहे. वास्तविक, विवेक ओबेरॉयचा हा व्हिडिओही चर्चेचा विषय बनला आहे कारण विवेक विना हेल्मेट आणि मास्क न घालता दुचाकी चालवताना दिसत आहे. विवेकचा हा व्हिडिओ समोर येताच सामाजिक कार्यकर्ते मीनु वर्गीस यांनी महाराष्ट्रातील गृहमंत्री अनिल देशमुख आणि राज्य पोलिसांना ओबेरॉयवर वाहतूक नियमांचे उल्लंघन केल्याबद्दल कारवाई करण्याची विनंती केली. यानंतर हेल्मेटशिवाय दुचाकी चालवल्याप्रकरणी मुंबई पोलिसांनी अभिनेत्याविरूद्ध ई-चालान जारी केले. त्याच वेळी सांताक्रूझ वाहतूक पोलिसांनी विवेकला दंड ठोठावला.

विवेक ओबेरॉय यांनी 14 फेब्रुवारी म्हणजे वैलेंटाइन डे च्या दिवशी आपल्या ट्विटर हँडलवरून एक व्हिडिओ शेअर केला होता, ज्यामध्ये तो आपल्या पत्नीसह साथीया या चित्रपटाच्या स्टाईलमध्ये मुंबईच्या रस्त्यावर बाइक चालविण्याचा आनंद घेत असल्याचे दिसून येत आले.  “या सुंदर व्हॅलेंटाईन डेची सुरुवात माझी पत्नीबरोबर!” असे कॅप्शन व्हिडिओ शेअर करताना अभिनेत्याने दिले होते. पण त्याच्या या व्हिडिओनेच त्याच्यासाठी अडचण निर्माण केली. या व्हिडिओनंतरच सामाजिक कार्यकर्ते मीनु वर्गीस यांनी मुंबई पोलिसांना आक्षेप नोंदवत त्यांच्यावर मास्क न घालण्याच्या आणि हेल्मेट न घातल्याबद्दल कारवाई करण्याची मागणी केली. 

 

संबंधित बातम्या