योगदिनी फिल्म्स डिव्हीजनचे दहा लघूपट पहा

pib
रविवार, 21 जून 2020

योगा करण्याचा आनंद घेताना पाहण्याचे आवाहन फिल्म्स डिव्हीजन करत आहे.

मुंबई, 

दि. 21जून 2020 या आंतरराष्ट्रीय योगदिनानिमित्त (IDY 2020)योगाचे शारिरीक आणि मानसिक स्वास्थ्यासाठी असलेले महत्व पटवून देण्यासाठी ‘सेलिब्रीटी स्पीक…..’ या शीर्षकांतर्गत लघुपटांच्या मालिका फिल्म्स डिव्हीजन प्रदर्शित करणार आहे. विविध भारतीय भाषांतील या दहा लघुपटांतून भारतातील ख्यातनाम व्यक्ती सहभागी होत असून हे लघुपट 24 तास फिल्म्स डिव्हीजनच्या संकेतस्थळावर प्रदर्शित होणार आहेत.

‘सेलिब्रीटीज स्पीक’ या लघुपटांतून, सुप्रसिध्द गायिका आशा भोसले, प्रसिध्द अभिनेते कबीर बेदी, मोहनलाल ,मामुटी, सुरेश गोपी, रमेशअरविंद, वेंकटेश, राणा डग्गुबत्ती,शिवा राज कुमार, शिवाजी साटम,सोनाली कुलकर्णी,पूर्णिमा सैकिया,रीताभरी चक्रवर्ती,क्रिकेटीयर अनिल कुंबळे याशिवाय अनेकजण योगा आणि प्राणायामाने शरीर,आत्मा आणि मन यांचा तोल कसा सांभाळता येतो याबद्दलचे त्यांचे अनुभव सांगणार आहेत.

यावर्षीचा आंतरराष्ट्रीय योगदिन (IDY 2020) कोविड 2019 महामारी सुरू असताना आला आहे. आरोग्य सुधारणे आणि तणाव दूर ठेवणे या योगाच्या लाभांचे महत्व म्हणूनच सध्याच्या काळात विशेष आहे.लोकांच्या येण्याजाण्यावर आणि रोजच्या गतींवर बंधने आली आहेत म्हणून यंदाच्या योगदिनाचा(IDY2020) भर घरातच राहून योग करून योगाचे फायदे मिळवण्यावर आहे.या योगदिनाची संकल्पना “योगा अँट होम योगा विथ फँमिली” हे आहे. दि. 31 मे रोजी पंतप्रधान मोदी यांनी आपल्या ‘मन की बात’ या कार्यक्रमातून प्रत्येकाला यंदाच्या आंतरराष्ट्रीय योगदिनी (IDY2020)“माय लाईफ माय योगा”ह्या व्हिडीओ ब्लाँगिंग स्पर्धेत सहभागी होण्याचे आवाहन केले होते. या दिवसाचा(IDY2020) आनंद वाढविण्यासाठी लोकांनी घरीच राहून योगा करण्याचे आणि ख्यातनाम व्यक्ती लघुपटांतून योगा करण्याचा आनंद घेताना पाहण्याचे आवाहन फिल्म्स डिव्हीजन करत आहे.

कृपया योगावरील या लघुपटांचा आस्वाद घेण्यासाठी www.filmsdivision.org या संकेतस्थळाला भेट द्या आणि डाँक्युमेंटरी आँफ द वीक  “Documentary of the Week”अथवा FD YouTube Channel फाँलो करा .आपल्या मित्रमैत्रिणी आणि प्रियजनांना याची माहिती द्या.

संबंधित बातम्या