रणबीर अन् आलियाचा 'ब्रह्मास्त्र' पाहण्याची संधी मिळणार अवघ्या 75 रुपयांमध्ये, जाणून घ्या

Ranbir Kapoor And Alia Bhatt: रणबीर कपूर आणि आलिया भट्ट यांचा बहुप्रतिक्षित 'ब्रह्मास्त्र' चित्रपट रिलीज होण्यास अवघे काही दिवस उरले आहेत.
Ranbir Kapoor And Alia Bhatt
Ranbir Kapoor And Alia BhattDainik Gomantak

Brahmastra: रणबीर कपूर आणि आलिया भट्ट यांचा बहुप्रतिक्षित 'ब्रह्मास्त्र' चित्रपट रिलीज होण्यास अवघे काही दिवस उरले आहेत. या चित्रपटात रणबीर आणि आलिया पहिल्यांदाच एकत्र दिसणार आहेत. अशा परिस्थितीत या चित्रपटाबाबत चाहत्यांमध्ये कमालीची उत्सुकता आहे. हा चित्रपट केवळ 75 रुपयांमध्ये चित्रपटगृहांमध्ये पाहता येणार आहे. तुम्हाला हे ऐकून आश्चर्य वाटले असेल ना! परंतु ही गोष्ट अगदी तंतोतंत खरी आहे.

ऑफर एका दिवसासाठी उपलब्ध असेल

मात्र, ही ऑफर फक्त एका दिवसासाठी आहे. वृत्तानुसार, मल्टिप्लेक्स असोसिएशन ऑफ इंडिया (MAI) आणि देशभरातील सिनेमा मालकांनी 16 सप्टेंबर रोजी राष्ट्रीय सिनेमा दिनानिमित्त सिनेमाच्या तिकिटांची किंमत 75 रुपयांपर्यंत कमी केली आहे. प्रत्येक चित्रपट (Movie) त्या दिवशी 75 रुपयांमध्ये पाहता येईल. ‘ब्रह्मास्त्र’ (Brahmastra) 9 सप्टेंबरला प्रदर्शित होत आहे, त्यामुळे 16 सप्टेंबरला तो 75 रुपयांमध्येही पाहता येईल.

Ranbir Kapoor And Alia Bhatt
Brahmastra: रणबीर कपूर चढला 'डान्स का भूत', पाहा व्हिडीओ

4000 थिएटर्स भाग घेत आहेत

16 सप्टेंबर रोजी राष्ट्रीय चित्रपट दिनानिमित्त 4000 चित्रपटगृहे त्याचा एक भाग बनत आहेत, जिथे चित्रपटांच्या तिकिटांची किंमत कमी करण्यात आली आहे. कोरोना महामारीनंतर चित्रपटगृहे पूर्णपणे सुरु झाल्याच्या आनंदात हा दिवस साजरा केला जात आहे. चित्रपटगृहांमध्ये अद्याप पुनरागमन न केलेल्या सिनेप्रेमींसाठी ही एक संधी म्हणून पाहिले जात आहे.

Ranbir Kapoor And Alia Bhatt
Ranbir Kapoor: रणबीर कपूर 8 नंबर का आहे लकी; नितू कपूरने केला खुलासा

अयानचा ड्रीम प्रोजेक्ट आहे 'ब्रह्मास्त्र'

'ब्रह्मास्त्र' हा अयान मुखर्जीचा ड्रीम प्रोजेक्ट आहे, ज्याचा पहिला भाग 'ब्रह्मास्त्र पार्ट वन: शिवा' 9 सप्टेंबर रोजी थिएटरमध्ये दाखल होणार आहे. या चित्रपटात रणबीर कपूर (Ranbir Kapoor), आलिया भट्ट (Alia Bhatt), अमिताभ बच्चन, नागार्जुन, मौनी रॉय यांच्या प्रमुख भूमिका आहेत. हा चित्रपट बनवण्यासाठी तब्बल 10 वर्षे लागली असून हा चित्रपट विविध भाषांमध्ये सुमारे 8000 स्क्रीन्सवर प्रदर्शित होणार आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com