'विराट-अनुष्का त्यांच्या बाळाला मिडियापासून ठेवणार दूर'

गोमन्तक वृत्तसेवा
गुरुवार, 31 डिसेंबर 2020

विराट कोहली आणि अनुष्का शर्मा हे काहीच दिवसात आई बाबा होणार आहेत. व्होग मॅगझिनला दिलेल्या मुलाखतीत तिने जाहीर केले की विराट कोहली आणि अनुष्का दोघेही आपल्या बाळाला सोशल मीडियापासून दूर ठेवू इच्छित आहेत.

मुंबई :  विराट कोहली आणि अनुष्का शर्मा हे काहीच दिवसात आई बाबा होणार आहेत, अनुष्काने गरोदरपणाच्या शेवटच्या टप्प्यात प्रवेश केला आहे, व्होग मॅगझिनला दिलेल्या मुलाखतीत तिने जाहीर केले की विराट कोहली आणि अनुष्का दोघेही आपल्या बाळाला सोशल मीडियापासून दूर ठेवू इच्छित आहेत. बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्मा तिच्या आयुष्यात मातृत्व अनुभवण्यास सज्ज झाली आहे. अभिनेत्री-निर्माती अनुष्का शर्मा आणि क्रिकेटपटू विराट कोहली जानेवारी 2021 मध्ये आपल्या पहिल्या बाळाला जन्म देतील. व्होग मॅगझिनला दिलेल्या मुलाखतीत तिने जाहीर केले की विराट आणि अनुष्का दोघंही त्यांचे मूल मिडिया स्पॉटलाइटपासून आणि सोशल मीडियापासून ठेवमार आहेत.

अनुष्का म्हणाली, "आम्हाला आमच्या बाळाला मुडिया समोर उभं करायचं नाहीये - त्याला आम्ही सोशल मीडियापासून लांब ठेवणार आहेत. मला असं वाटतं की आपल्या मुलाने हा निर्णय घेण्यास सक्षम असा हा निर्णय आहे. त्याला कोणत्याही प्रकारचं खास अटेन्शन मिळू नये अशी आमची इच्छा आहे. आमच्या बाळाला त्याची स्वत:ची तत्वं असावीत, त्यानी सगळ्यांचा आदर करावं आणि त्याला त्याचं आयुष्य कसं हवं आहे, हे त्यानी ठरवावं".

विराटबरोबर सह-पालकत्वाची कर्तव्ये स्वीकारण्याविषयी बोलताना, "आम्ही हे आई-वडील कर्तव्य म्हणून नाही तर कौटुंबिक जबाबदारी म्हणून पाहतो. आमच्यासाठी आमच्या मुलांचे संगोपन अत्यंत संतुलित दृष्टिकोनातून होणे महत्वाचे आहे. हे आमच्या दोघांचही समान कर्तव्य आहे. मला आई म्हणून सुरूवातीची काही वर्षं जास्त काळजी घ्यावी लागेल. आम्ही दोघंही कामात व्यस्त असता, त्यामुळे आमचं बाळ आल्यावर आम्हाला जास्तीत जास्त वेळ एकत्र कसा घालवता येईल, याकडे आम्ही विशेष लक्ष देणार आहोत, असं अनुष्का म्हणाली. 2008 मध्ये रब ने बना दी जोडी या रोमान्टिक फ्लिकमध्ये अनुष्का शर्माने सुपरस्टार शाहरुख खानसोबत पदार्पण केलं होतं . तिने इटलीमध्ये 2017 क्रिकेटर विराट कोहलीशी लग्न केलं.

संबंधित बातम्या