Wedding Anniversary: लंडनला जाण्यासाठी दुसऱ्याच दिवशी बीग बीने केलं होतं लग्न

गोमंन्तक वृत्तसेवा
गुरुवार, 3 जून 2021

बॉलिवूडचे लोकप्रिय आणि लाडके कपल अमिताभ बच्चन(Amitabh Bachchan) आणि जया बच्चन(Jaya Bachchan) यांच्या आज लग्नाचा आज वाढदिवस(wedding anniversary) आहे. 1973 मध्ये त्यांनी लग्न केलं.

बॉलिवूडचे लोकप्रिय आणि लाडके कपल अमिताभ बच्चन(Amitabh Bachchan) आणि जया बच्चन(Jaya Bachchan) यांच्या आज लग्नाचा आज वाढदिवस(wedding anniversary) आहे. 1973 मध्ये त्यांनी लग्न केलं. अजूनही लग्नानंतर दोघेही पूर्वीप्रमाणेच एकमेकांवर प्रेम करतात. या व्यतिरिक्त दोघेही एकमेकांच्या कठीण काळात साथ देतात. दोघेही एकमेकांचे पूर्ण समर्थन करतात. प्रत्येक वेळी लग्नाच्या वाढदिवसानिमित्त बिग बी नक्कीच सोशल मीडियावर पोस्ट्स शेअर करतात आणि यावेळीसुद्धा त्यांनी पोस्ट शेअर केली आहे. बिग बीने जया बच्चनसोबत लग्नाचे फोटो शेअर केले आहेत.(Wedding Anniversary The very interesting story of Amitabh bachchan and Jaya Bachchan wedding)

दोघांच्या लग्नाच्या फेऱ्यांच्यावेळचे हे फोटो आहे. जया बच्चन यांनी  रेड वेडिंग ड्रेस घातला आहे आणि बिग बीने ऑफ-व्हाइट शेरवानी घातली आहे. फोटो शेअर करताना बिग बीने या पोस्ट साजेस असं कॅप्शनही दिले आहे. "3 जून, 1973, लग्नाच्या वाढदिवसानिमित्त आपल्या प्रार्थना आणि शुभेच्छांसाठी धन्यवाद."

तुर्की सिनेमात रोबोट साकारणार मुख्य भूमिका 

लग्नाची अविस्मरणीय आठवण
बिग बी आणि जया बच्चन यांच्या लग्नाची कहाणी बरीच रंजक आहे. बिग बी आणि जया बर्‍याच दिवसांपासून एकमेकांच्या प्रेमात होते. जंजीर रिलीज झाला तेव्हा बिग बीने आपल्या सर्व मित्रांना प्रॉमिस केले होते की, जर चित्रपट हिट झाला तर ते सर्वांसोबत लंडनला जाईल. त्यानंतर हा चित्रपट हिट झाल्यानंतर जेव्हा बिग बीने त्यांच्या वडिलांना सांगितले की, ते काही मित्र आणि जयासमवेत इंग्लंडला जाणार आहेत. तेव्हा त्यांच्या वडिलांनी नी बिग बीला सांगितले की तुम्हाला जर जयाला बरोबर घेऊन जायचे असेल तर दोघांना आधी लग्न करा, मग तुम्हाला जिथे जायचे आहे तेथे जा.

3-Idiotsच्या त्या सिन साठी आम्ही खरच ड्रिंक केली होती; शर्मन जोशीने सांगितला भन्नाट अनुभव  

दुसऱ्याच दिवशी लग्न

त्यानंतर दुसऱ्या दिवशी पंडित आणि जवळच्या कुटुंबीयांना आणि मित्रांना बोलावले आणि दोघांचे लग्न झाले. आणि त्याच रात्री दोघेही सहलीला निघाले. बिग बी आणि जया बच्चन यांनी बंसी बिरजू, एक नजर, जंजीर, अभिमान, मिली, छुपके-छुपके, शोले, सिलसिला आणि कभी खुशी कभी गम अशा अनेक उत्तम चित्रपटांमध्ये एकत्र काम केले आहे.
 

संबंधित बातम्या