Nana Patekar- Anil Kapoor
Nana Patekar- Anil KapoorDainik Gomantak

Welcome 3: 'नाना आणि अनिल कपूर शिवाय चित्रपट अपूर्णच' अक्षयच्या वेलकम 3 वर चाहते नाराज

Welcome 3: पण आता अक्षय आणि रवीना 'वेलकम 3' च्या अनाउंसमेंट व्हिडिओमध्ये एकत्र दिसत आहेत.

Welcome 3: बॉलीवूडचा खिलाडी अक्षय कुमार ओएमजी २ नंतर लवकरच एका कॉमेडी आणि मलल्टीस्टारर फिल्ममधून प्रेक्षकांचे मनोरंजन करण्यासाठी सज्ज झाला आहे. आपल्या वाढदिवसानिमित्त अक्षयने वेलकम ३ ची घोषणा केली आहे. या चित्रपटाच्या माधम्यातून रवीना टंडन पून्हा एकदा बॉलीवू़डमध्ये पदार्पण करत आहे.

अक्षय कुमार, परेश रावल यांच्यासह सुनील शेट्टी, संजय दत्त, अर्शद वारसी, श्रेयस तळपदे, रवीना टंडन, जॅकलीन फर्नांडीस, दिशा पटानी, जॉनी लिव्हर, तुषार कपूर यासारखे अनेक कलाकार दिसून येत आहेत. इतकंच नाही तर मिका सिंग आणि दलेर मेहंदीही या व्हिडिओमध्ये दिसत आहेत. यावेळी दिग्दर्शनाची जबाबदारी अहमद खानकडे सोपवण्यात आली आहे.

मात्र ज्यांच्यामुळे वेलकमचे आधीचे दोन्ही चित्रपट गाजले ते नाना पाटेकर आणि अनिल कपूर कुठेही दिसले नाहीत. या दोन्ही चित्रपटातील नाना आणि अनिल कपूरची केमिस्ट्री प्रेक्षकांना भलतीच आवडली होती.

आता मात्र या दोघेही दिसत नसल्याने प्रेक्षक मात्र नाराज झाले आहेत. संपूर्ण बॉलीवूड जरी चित्रपटात आणलं तरी नाना आणि अनिल कपूर यांची कमी पूर्ण करु शकत नाहीत असे प्रेक्षक सोशल मिडियावर म्हणताना दिसून येत आहेत.

2007 मध्ये 'वेलकम' रिलीज झाला होता ज्यामध्ये अक्षय कुमार व्यतिरिक्त अनिल कपूर, परेश रावल, कतरिना कैफ, नाना पाटेकर यांसारखे स्टार्स दिसले होते. त्यावेळी दिग्दर्शन अनीस बज्मीने केले होते. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर हिट ठरला आणि त्यानंतर निर्मात्यांनी त्याच्या सिक्वेलची तयारी केली. ज्याला निर्मात्यांनी वेलकम बॅक असे नाव दिले आहे. याचं दिग्दर्शनही अनीस बज्मी यांनी केलं होतं.

अक्षय आणि रवीना 19 वर्षांनंतर 'वेलकम 3' मध्ये एकत्र

अक्षय कुमार आणि रवीना टंडन देखील 19 वर्षांनंतर 'वेलकम 3' मध्ये एकत्र काम करणार आहेत. एक वेळ अशी होती जेव्हा दोघांचे अफेअर होते आणि गुपचूप साखरपुडा केल्याचे म्हटले जात होते. त्यानंतर 'मोहरा' कलाकारांमध्ये कटुता निर्माण झाली आणि दोघेही वेगळे झाले. पण आता अक्षय आणि रवीना 'वेलकम 3' च्या निमित्ताने पून्हा एकत्र आल्याचे म्हटले जात आहे.

Nana Patekar- Anil Kapoor
Malaika Arora Skin Care: मलायका म्हणते... सुंदर त्वचेसाठी 'या' गोष्टी नक्की फॉलो करा

दरम्यान, 'वेलकम 3'ची रिलीज डेटही समोर आली आहे. निर्मात्यांनी वेलकम टू द जंगलसाठी 20 डिसेंबर 2024 ही तारीख निश्चित केली आहे. याचा अर्थ अक्षय कुमारने पुढच्या वर्षीच्या ख्रिसमसचे बुकिंग केले आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com