
Kuttey Review दिग्दर्शक विशाल भारद्वाजचा बहुचर्चित कुत्ते आज रिलीज झाला. या चित्रपटाची आणि त्याच्या ट्रेलरची चांगलीच चर्चा झाली होती. इंडस्ट्रीतले दिग्गज यात काम करत असल्याने या चित्रपटाविषयी प्रचंड उत्सुकता निर्माण झाली होती.चला पाहुया चित्रपट नेमका आहे तरी कसा?
हिंदी चित्रपट बघणाऱ्या कुठल्याही प्रेक्षकाला 'कुत्ते' हा शब्द माहित नाही असं होणार नाही. सगळ्या शिव्या आणि राग व्यक्त करायचा असेल तर हाच शब्द वापरला जायचा.बिचारा तो प्रामाणिक प्राणी स्वत:चा होत असलेला उद्धार बघुन किती अस्वस्थ असेल ते त्याचं त्यालाच माहित.
आता दिग्दर्शक आसमान भारद्वाजने याच्या पुढे जात कुत्ते शब्दातुन माणसाच्या वृत्तीची गोष्ट सांगितली आहे. या चित्रपटात अर्जुन कपूर, तब्बू, राधिका मदन, कोंकणा सेन, कुमुद मिश्रा, नसीरुद्दीन शाह असे स्टार्स दिसणार आहेत.
दिग्दर्शक आणि चित्रपट निर्माते विशाल भारद्वाज यांचा मुलगा आस्मान भारद्वाज याने या चित्रपटाद्वारे दिग्दर्शनात पदार्पण केले आहे. आस्मानने दिग्दर्शक म्हणून त्याच्या चित्रपटात आकाशाला भिडले आहे की नाही हे सांगूया
आता पाहुया गोष्ट. गोष्टीची सुरुवात अत्यंत भ्रष्ट असलेल्या दोन पोलिसांपासून होते. हे भ्रष्ट पोलीस एका कारणामुळे अडचणीत येतात, ज्यातून बाहेर पडण्यासाठी त्यांना आता खूप पैशांची गरज आहे. आता या अडचणीतुन बाहेर पडण्यासाठी एटीएममध्ये पैसे जमा करण्यासाठी येणारी व्हॅन लुटण्याची योजना हे दोन भ्रष्ट पोलिस करतात.
आता गोष्ट केवळ या दोघांपुरती राहत नाही. तर या दोघांच्या लुटीच्या कार्यक्रमात अनेक जण अडकले जातात. आता हे लोक एकमेकांशी कसे जोडले जातात आणि ही व्हॅन लुटली जाते का, या लोकांचं काय होतं? अडकतात का? पैशाची गरज असलेल्या पोलीसांना पैसे मिळतात का? या सगळ्या प्रश्नांची उत्तरे हवी असतील तर चित्रपटगृहात जावे लागेल.
पण चित्रपट बघण्याआधी एक मोलाचा सल्ला ऐकाच - आस्मान भारद्वाजचा 'कुत्ते' हा चित्रपट अजिबात कौटुंबिक नाही. त्यामुळे तुम्हाला कुटूंबासोबत असा चित्रपट बघायला काही अडचण नसेल तरच कुटूंबाला घेऊन जा. कारण यातल्या शिव्या, गोळ्या आणि हिंसा आणि प्रचंड रक्तपात आहे. आजूबाजूला रक्ताचे लोट उडताना पाहायला मिळतील.
दिग्दर्शक विशाल भारद्वाज यांच्या चित्रपटांची स्वतःची शैली आहे. 'कुत्ते'मध्ये आस्मानच्या दिग्दर्शनात वडिल विशाल भारद्वाज यांची स्टाईल दिसते पण त्याचा स्वत:ची अशी त्यांच्या स्वत:ची अशी एक वेगळी शैली पहिल्याच चित्रपटात सेट झाली आहे हे नक्की. '
जेव्हा तुमच्याकडे अतीशय अनुभवी आणि तगडे कलाकार असतात आणि अशावेळी नवोदित दिग्दर्शक म्हणून काम करणं अतीशय अवघड गोष्ट असते. पण या मल्टिस्टारर चित्रपटात आसमान भारद्वाजने मात्र अतिशय चांगल्या पद्धतीने दिग्दर्शन केले आहे.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.
दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.