संजय दत्तसाठी वडिलांनी बाळासाहेब ठाकरेंकडे मदत मागितली, बाळासाहेब म्हणाले...

गोमंतक ऑनलाईन टीम
मंगळवार, 17 नोव्हेंबर 2020

मुंबई ब्लास्टनंतर संजय दत्तचं नाव समोर आलं होतं. या वाईट काळातून बाहेर पडण्यासाठी त्याचे वडील सुनील दत्त पूर्ण ताकदीनिशी प्रयत्न करत होते. यावॆळी बाळासाहेबांनी दत्त कुटुंबाला केलेल्या मदतीची आजतागायत चर्चा होते.

मुंबई- आज 17 नोव्हेंबरला शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची पुण्यतिथी आहे. बाळासाहेब ठाकरे यांचे बॉलिवू़ड कनेक्शन सर्वश्रूत आहे. एकेकाळी बॉलिवूडचा बॅडबॉय म्हणून ओळखला जाणारा संजय दत्तचा परिवार जेव्हा संकटात सापडला होता त्यावेळी त्याने बाळासाहेबांची मदत मागायचं ठरवलं. मुंबई ब्लास्टनंतर संजय दत्तचं नाव समोर आलं होतं. या वाईट काळातून बाहेर पडण्यासाठी त्याचे वडील सुनील दत्त पूर्ण ताकदीनिशी प्रयत्न करत होते. यावॆळी बाळासाहेबांनी दत्त कुटुंबाला केलेल्या मदतीची आजतागायत चर्चा होते.

सुनील यांनी तत्कालीन शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची भेट घेतली. सुनील दत्त हे काँग्रेसचे मोठे नेते होते. सामाजिक कामे करण्यात सुनील दत्त कायमच पुढे असत. मात्र, मुंबई बॉम्ब स्फोटानंतर ज्यावेळी संजय दत्तचं नाव आलं त्यावेळी केंद्रात काँग्रेसची सत्ता असूनही त्यांना पक्षाकडून मदत मिळाली नाही.  

सुनील दत्त यांनी या दरम्यान काँग्रेसच्या अनेक बड्या नेत्यांच्या भेटी घेतल्या. मात्र, मदत न मिळाल्याने त्यांनी राजेंद्र कुमार यांचे ऐकत मातोश्रीवर जाण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार संजय दत्तला घेऊन सुनील आणि राजेंद्र कुमार मातोश्रीवर आले. येथे त्यांनी बाळासाहेबांची भेट घेतली. त्यावेळी सुनील दत्त समोर आल्यावर बाळासाहेब म्हणाले होते की, 'मला माहिती आहे की, तुम्हाला मी आवडत नाही. मात्र, मी काहीकाळ तुमच्या अभिनयाचा फॅन होतो. यानंतर सुनील दत्त यांनी हसत दुजोरा दिला. बाळासाहेबांबद्दलचे पूर्वग्रह त्यांनी तात्काळ बाजूला सारत मदत मागितली.    

सुनील दत्त यांनी बाळासाहेबांशी बोलणे सुरू करताना अतिशय भावूक स्वरात सुरूवात केली. सुनील यांची पूर्ण गोष्ट ऐकून घेत बाळासाहेबांनी, ‘मैं आपकी मदद करूंगा लेकिन मैं जो कुछ भी करूंगा वह सिर्फ आपके लिए करूंगा। संजय दत्त के लिए नहीं', अशा स्पष्ट शब्दात सांगितले. 

बाऴासाहेबांनी यानंतर संजय दत्तला आपल्या खोलीत बोलवले आणि चांगलेच झापले. त्यांनी संजय दत्तला ताकीद देताना,  ‘अब वही करना जो तुम्हारे पिता कहें,किसी के बहकावे में मत आना', असे स्पष्ट सांगितले. काहींचं असंही म्हणणं आहे की यानंतर बाळासाहेबांना भेटल्यावर सुनील दत्त यांनी राजकारणातून संन्यास घेण्याचादेखील निर्णय घेतला होता. 

संबंधित बातम्या