
Vijay Sethupathi On Shahrukh: साऊथचा सुपरस्टार आणि एक तगडा अभिनेता म्हणुन ओळखला जाणारा अभिनेता विजय सेतुपती(Vijay Sethupathi) लवकरच शाहरुख(Shah Rukh Khan) खानसोबत आगामी 'जवान' चित्रपटात दिसणार आहे.
विजय सेतुपतीने सांगितले की कशा शाहरुखने शूटिंग दरम्यान त्याला मदत केली आणि जेव्हा त्याने 'किंग खान'ला सॉरी म्हटले तेव्हा त्यावर शाहरुखने काय प्रतिक्रिया दिली?
विजय के.के मेनन सोबत 'फर्जी' या सिरीजमध्येही दिसणार आहे. या वेब सिरीजचं सध्या जोरदार प्रमोशन सुरू आहे.
अभिनेता विजय सेतुपतीच्या 'फर्जी' या वेब सीरिजची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे. त्याचा ट्रेलर रिलीज झाला असून प्रेक्षकांकडुन त्याला चांगला प्रतिसाद मिळत आहे. विजय सेतुपतीची हिंदीत या चित्रपटाने एक धमाकेदार एन्ट्री होणार आहे.
विजय सेतुपती आता शाहरुख खानच्या 'जवान' चित्रपटातही दिसणार आहे, ज्याचे दिग्दर्शन अॅटली यांनी केले आहे. या चित्रपटात शाहरुख खानसोबत काम करण्याचा अनुभव विजय सेतुपतीने नुकताच शेअर केला.
विजय सेतुपती यांनी या सीनवर चर्चा करताना शाहरुखला सॉरी म्हटल्यावर त्याने कशी प्रतिक्रिया दिली हे सांगितले.
विजय सेतुपतीचा हा अनुभव 'जवान'च्या शूटिंगच्या पहिल्या दिवशीचा आहे. जेव्हा विजय सेतुपती सेटवर पोहोचला तेव्हा तो खूप घाबरला होता. पण शाहरुख खानने त्याला समजुन घेतले. विजयची मनस्थिती स्वत: शाहरुखने समजुन घेतल्यामुळे साहजिकच त्याला धीर आला.
विजय सेतुपती यांनी एका मुलाखतीत संवाद साधताना विजयने सांगितले की, शूटिंगदरम्यान शाहरुख त्याला प्रोत्साहन देत असे आणि रिहर्सलसाठी नेहमीच तयार असायचा.
विजय सेतुपती शाहरुखच्या बाबतीत म्हणतो, "तो खूप गोड आहे. त्याच्यासोबत काम करताना खूप मजा आली. पहिला दिवस थोडा चिंताग्रस्त होता कारण तो (शाहरुख खान) खूप मोठा कलाकार आहे. पण शाहरुखने मला तणावमुक्त केले.
"पहिल्या दिवशी शाहरुखकडे शूटसाठी कोणतेही सीन नव्हते, पण ते सेटवर माझ्यासाठी आले होते. त्याच्यामुळे मला आरामदायी वाटले. मी त्यांच्याशी चर्चाही करू शकतो. शाहरुख ही एक अतिशय सज्जन व्यक्ती आहे. शाहरुख सरांसोबत माझा चांगला वेळ गेला.
विजय सेतुपतीने सांगितले की, जेव्हा ते सीनवर चर्चा करताना 'सॉरी सर, जर तुम्हाला डिस्टर्ब' म्हणायचे तेव्हा ते 'नो विज, डिस्टर्ब' कर. विजय सेतुपतीने दुसऱ्या एका मुलाखतीत सांगितले की, शाहरुख कधीच दाखवत नाही की तो इतकी वर्षे इंडस्ट्रीचा एक भाग आहे आणि सुपरस्टार आहे.
विजय पुढे म्हणाला, "शाहरुख सर कधीच दाखवत नाहीत की मी माझ्या सहकलाकारांसोबत अशा प्रकारे काम करतो. मी माझ्या सीन्सची त्यांच्याशी आरामात चर्चा करायचो. मी त्याच्याबरोबर खूप आरामात काम करत होतो. काम करताना मजा आली".शाहरुखबाबत असं बोलुन विजयने स्वत:ही एक चांगला माणूस असल्याचं सिद्ध केलं आहे.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.
दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.