आलियाच्या विधानाने चाहते झाले विचलित

दैनिक गोमन्तक
बुधवार, 23 डिसेंबर 2020

आलियाने आता तिच्या लग्नाबाबत खूप मोठे विधान केले आहे. तीचे हे म्हणणे ऐकून त्यांचे चाहते झाले विचलित.

मुंबई: रणबीर आणि आलियाच्या लग्नाबद्दल फॅन्स खूप उत्सुक आहे. दोघांनीही लवकरात लवकर लग्न करावे अशी इच्छा चाहत्यांचा आहे, पण आलियाने आता तिच्या लग्नाबाबत खूप मोठे विधान केले आहे. तीचे हे म्हणणे ऐकून त्यांचे चाहते झाले विचलित.

बॉलिवूडचे लव्ह कपल आलिया भट्ट आणि रणबीर कपूर आजकाल सर्वत्र एकत्र दिसतात. चाहत्यांनाही दोघांची जोडी खूप आवडते. म्हणूनच या दोघांना एकत्र पाहून प्रत्येकाच्या मनात एकच प्रश्न येतो की हे दोघे लग्न कधी करणार? तर आलियाला तिच्या लग्नाबद्दल काय म्हणायचे आहे ते बघूया.

सध्या मी खूप लहान आहे
 जेव्हा मीडियाने लग्नाबद्दल विचारले तेव्हा आलिया म्हणाली की आजकाल प्रत्येकजण मला इथे असाच प्रश्न विचारत आहे. तिने सांगितले की ती केवळ 25 वर्षांची आहे. आणि आपण इतक्या लवकर लग्न कसे करू शकता? आणि जर कोणाला मला प्रश्न विचारायचे असतील तर माझ्या करीयर बद्दल विचारा, आमचं लग्न होईल तेव्हा सगळ्यांना सांगितले जाईलच.

 

आलियाच्या या उत्तरावर चाहत्यांना काय वाटले?

आता जेव्हा आलियाने हे स्पष्ट केले आहे की ती लवकर लग्न करणार नाही तर कदाचित तिच्या चाहत्यांना हे उत्तर ऐकण्यास आवडणार नाही. पण आलियाच्या या विधानावरून प्रत्येकाला आपआपली उत्तर नक्कीच मिळाली असतील. चित्रपटाविषयी बोलतांना आलिया लवकरच तिच्या आगामी गंगूबाई काठियावाडी चित्रपटाचे चित्रीकरण सुरू करणार आहे. चित्रपटाचे पोस्टर प्रसिद्ध झाले आहे. यापूर्वी आलिया 'रोड 2' या चित्रपटामध्ये दिसली होती.

 

संबंधित बातम्या