चित्रपटगृहाचा पडदा कधी उघडणार? आगामी काळात चित्रपट OTT वर पहावे लागणार...

दैनिक गोमंतक
रविवार, 16 मे 2021

कोरोनाच्या पहिल्या लाटेत अनेक मोठ्या कलाकारांनी त्यांचे चित्रपट OTT वर प्रदर्शित केले होते.

मुंबई: चित्रपट हा नेहमी थेटरमध्ये पाहावा असे नेहमी सिनेमाप्रेमी बोलत असतात. परंतु आता या कोरोना संकटासारख्या (Coronavirus) परिस्थिती हे वाक्य बोलणे चुकीचे ठरणार आहे. कोणता ही सिनेमा प्रदर्शित झाला की प्रत्येक अभिनेता आपला चित्रपट सिनेमागृहात जावून पहा असे आवाहन करत असे. परंतु आता कोणताच अभिनेता असं बोलताना दिसत नाही कारण कोरोनामुळे परिस्थिती बदलेली आहे.   

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे सिनेसुष्टीचे पूर्ण चित्रच पालटून गेले आहे. मल्टिप्लेक्स बंद असल्यामुळे गेल्या वर्षी म्हणजेच कोरोनाच्या पहिल्या लाटेत अनेक मोठ्या कलाकारांनी त्यांचे चित्रपट OTT वर प्रदर्शित केले होते. त्यामुळे सर्वाना घरी बसून मोबाइल, लॅपटॉप वर चित्रपट पाहण्याचा आनंद घेता आला. यात बिग बी अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) आणि आयुष्यमान खुराणा (Ayushmann Khurrana) यांचा 'गुलाबो सीताबो', विद्या बालनाचा- 'शकुंतला', संजय दत्त (Sanjay Dutt) आणि आलिया भट (Alia Bhatt) यांचा 'सडक' हे  सर्वच चित्रपट 2020 मध्ये मल्टीपेल्स मध्ये येणार होते, परंतु लॉकडाऊनमुळे OTT वर निर्मात्यांना चित्रपट प्रदर्शित करावे लागले.   

लग्नाआधीच डायरेक्टरने माधुरी दीक्षितसमोर ठेवली होती अनोखी अट, आणि...

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे हे चित्र पुन्हा पाहायला मिळत आहेत. यंदा देखील सर्व चित्रपट OTT वर प्रदर्शित होत आहेत. बॉक्स ऑफिस चा सुलतान सलमान खान ने सुद्धा आपला 'राधे' चित्रपट OTT वर प्रदर्शित केला आहे.  जे चित्रपट गेल्या वर्षापासून मल्टीपेलक्स उघडण्याची वाट पाहत होते, त्यांनी देखील आता आपला  चित्रपट OTT वर प्रदर्शित करण्याचा निर्णय घेतला आहे. या यादीत 83 चित्रपटांचा समावेश आहे. कपिल देव यांच्या आयुष्यावरील आधारित चित्रपट 2020 मध्ये जून महिन्यात मल्टीपेल्समध्ये प्रदर्शित होणार होता. परंतु लॉकडाऊनमुळे (Lockdown) रणवीर सिंग आणि कबीर खान यांनी  हा चित्रपट पुढे ढकलला होता. आता हा चित्रपट देखील OTT वर प्रदर्शित करण्याची चर्चा सुरु आहे.  

‘मनी हाईट्स’ मधील ‘Bella Ciao’ च्या मराठी व्हर्जनमधून दिला जातोय सामाजिक संदेश 

आता सर्वांना आतुरता लागली आहे ती  रोहित शेट्टी आणि अक्षय यांच्या 'सुर्यवंशी' चित्रपटाची. गेल्या वर्षापासून सर्वजण या  चित्रपटाची वाट पाहत आहेत. हा चित्रपट मल्टीपेल्समध्ये पाहायला मिळेल असे खिलाडी कुमार आणि रोहित शेट्टी यांनी सांगितले आहे. परंतु जर अशीच परिस्थिती राहीली तर हा चित्रपट OTT वर  प्रदर्शित करावा लागेल अशी चर्चा  सिनेसृष्टी रंगताना दिसत आहे. अशीच परिस्थिती राहिली तर 70 MM चा परदा कधी उघडेल का असा प्रश्न निर्माण झाला आहे.

संबंधित बातम्या