Radhe Release Time: कुठे आणि कधी प्रदर्शित होणार सलमान खानचा राधे; जाणून घ्या

दैनिक गोमंतक
बुधवार, 12 मे 2021

सलमान खानच्या चाहत्यांसाठी अखेर गुड न्यूज आली आहे.  

सलमान खानच्या (Salman Khan) चाहत्यांसाठी अखेर गुड न्यूज आली आहे.  सलमानचा प्रतीक्षेत असलेला चित्रपट 'राधे-योर मोस्ट वॉन्टेड भाई' (Radhe-Your Most Wanted Bhai)  प्रेक्षकांपर्यंत येणार आहे. तथापि, देशातील चित्रपटगृहात दर्शकांना हा चित्रपट पाहता येणार नाही, कारण कोरेना विषाणूमुळे (Coronavirus) राधे सिनेमागृहात प्रदर्शित होणार नाही, परंतु  हा चित्रपट थिएटरमध्ये प्रदर्शित होणार नसला तरी, तो डिजिटल प्लॅटफॉर्मवर पाहता येणार आहे. आपल्या सोयीसाठी, आम्ही सांगत आहोत की आपण चित्रपट कोठे आणि कोणत्या वेळी पाहू शकता.(Where and when is Salman Khan's Radhe screened)

रेखा अन् इम्रान खानची 'अधूरी एक कहाणी', वाचा रंजक किस्सा

झी ५ आॅपवर देण्यात आलेल्या माहितीनुसार, राधे- योर मोस्ट वॉन्टेड भाई  13 मे रोजी दुपारी 12 वाजता प्रदर्शित केला जाईल, परंतु चित्रपट पाहण्यासाठी प्रेक्षकांना झिप्लेक्सवरती (Zeeplex) जावे लागेल. झिप्लेक्सवर चित्रपट पाहण्यासाठी प्रेक्षकांना निश्चित किंमत मोजावी लागते. यासाठी वापरकर्त्याने झी ५ (ZEE5) वर लॉग इन करून झिप्लेक्स पर्याय निवडावा लागेल, त्यानंतर तुम्हाला पेमेंट पेजवर जाऊन पेमेंट मोड निवडून पैसे भरावे लागतील. पैसे पे केल्यानंतर  चित्रपट पाहता येईल. राधे चित्रपटाला सेन्सॉर बोर्डाने यू / ए प्रमाणपत्र दिले आहे, म्हणजे दर्शक केवळ पालकांच्या मार्गदर्शनातच हा चित्रपट पाहू शकतात. राधेचा कालावधी एक तास 57 मिनिटे असल्याचे सांगितले जाते. सलमानचा हा सर्वात छोटा चित्रपट आहे.

Viral Video: पाहा प्रपोज करण्याचा खास अंदाज

राधे हा सलमान खानचा पहिला चित्रपट आहे जो भारतातल्या ओटीटी प्लॅटफॉर्मवर थेट प्रदर्शित होत आहे. तथापि, हा चित्रपट परदेशातील 700 हून अधिक स्क्रीनवर प्रदर्शित होत आहे. राधे हा  प्रभुदेवा दिग्दर्शित अ‍ॅक्शन चित्रपट आहे. चित्रपटाची कथा मुंबईत सेट करण्यात आली आहे, जिथे सलमानची व्यक्तिरेखा अंडरकव्हर कॉपची आहे .राधे ड्रग्स माफियांविरुद्ध लढत आहे. या चित्रपटात दिशा पाटनी, रणदीप हूडा, जॅकी श्रॉफ, गौतम गुलाटी मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. 2019 मध्ये रिलीज झालेला सलमानचा शेवटचा चित्रपट  दबंग 3 आहे. दबंग 3 आणि राधे हे दोन्ही चित्रपट प्रभुदेवाने  दिग्दर्शित आहेत. बॉक्स ऑफिसवर यशस्वी ठरलेल्या प्रभुदेवा दिग्दर्शित 2009 च्या वांटेड या चित्रपटात सलमानने प्रथम अभिनय केला.

 

संबंधित बातम्या