Veer Sawarkar Biopic: कोण साकारणार स्वातंत्र्यवीर सावरकरांची भूमिका?

गोमंन्तक वृत्तसेवा
सोमवार, 7 जून 2021

चित्रपट निर्माता संदीपसिंग यांनी स्वातंत्र्यसैनिक विनायक दामोदर सावरकर(Vinayak Damodar Sawarkar)  यांच्या 138 व्या जयंतीनिमित्त बायोपिक बनवण्याची घोषणा केली होती. वीर सावरकरांच्या भूमिकेसाठी आता एका नावाचा विचार केला जात आहे.

मुंबई: अभिनेता राजकुमार राव, आयुष्मान खुराना आणि रणदीप हुडा या तीन अभिनेत्यांनी आपल्या कामाने स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. या तिघांपैकी एक ‘स्वातंत्र्यवीर सावरकर’ यांची भूमिका साकारणार असल्याची चर्चा आहे. दिग्दर्शक महेश मांजरेकर यांनी सावरकर यांच्या 138 व्या जयंतीनिमित्त स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या जीवनावर आधारित चित्रपट प्रेक्षकांसाठी घेऊन येत असल्याची घोषणा केली होती.(Who will play the role of Swatantryaveer Savarkar)

या चित्रपटातून महेश मांजरेकर सावरकरांचे जीवन, त्यांचे विचार, भारताला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी त्यांनी केलेला संघर्ष उलगडणार आहेत. या चित्रपटात कोणता अभिनेता सावरकरांची भूमिका करणार हे निर्मात्यांनी अजून उघड केलेले नसल्याने त्याकडे सर्वांचेच लक्ष लागले होते. मात्र आता अभिनेता राजकुमार राव, आयुष्मान खुराना आणि रणदीप हुडा या तीन अभिनेत्यांपैकी एका अभिनेत्याचा या चित्रपटात सावरकरांची भूमिका साकारण्यासाठी विचार सुरू आहे. चित्रपट निर्माता संदीप सिंह हे अमित वाधवानी यांच्यासोबत मिळून या चित्रपटाची निर्मिती करणार आहेत. 

Video Viral: कियारा आडवाणीचा जलपरी वाला अंदाज 

मुळालेल्या माहितीनुसार आयुष्मान वीर सावरकरांच्या भूमिकेसाठी उत्तम अभिनेता मानला जात आहे. अंदमान, लंडन आणि महाराष्ट्रात या चित्रपटाचे चित्रीकरण होणार असल्याचे वृत्त आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा बायोपिक बनवणारे निर्माता संदीप सिंह, वीर सावरकरांवर बायोपिक बनवण्याच्या तयारीत आहे. त्यांनी 28 मे रोजी आपल्या इंस्टा अकाउंटवरून 'स्वतंत्रवीर सावरकर' चित्रपटाचे पोस्टरही शेअर केले होते. संदीपने, वीर सावरकर यांच्या 138 व्या जयंतीनिमित्त फिल्म बनवण्याची घोषणा केली होती. आणि महेश मांजरेकर चित्रपटाचे दिग्दर्शन करणार आहेत.

आता द फॅमिली मॅन 3; श्रीकांत तिवारी चीनशी लढणार? 

संबंधित बातम्या