सैफ अली खानपासून घटस्फोट घेतल्यानंतर अमृता सिंगने दुसरे लग्न का केले नाही?

अमृता सिंगने (Amrita Singh) सैफच्या आयुष्यात पहिल्यांदा प्रेमाच्या रुपात प्रवेश केला होता जेव्हा अभिनेता फक्त 20 वर्षांचा होता.
सैफ अली खानपासून घटस्फोट घेतल्यानंतर अमृता सिंगने दुसरे लग्न का केले नाही?
Why did Amrita Singh not marry for the second time after her divorce from Saif Ali Khan? Dainik Gomantak

बॉलिवूड अभिनेता सैफ अली खान (Saif Ali Khan) असा अभिनेता आहे ज्याचे वैयक्तिक आयुष्य नेहमीच डोळ्यांखाली असते. अमृता सिंगने (Amrita Singh) सैफच्या आयुष्यात पहिल्यांदा प्रेमाच्या रुपात प्रवेश केला होता जेव्हा अभिनेता फक्त 20 वर्षांचा होता. एका चित्रपटाच्या सेटवर अमृताला पाहिलं, त्यानंतर भेटीचा फेरा सुरू झाला आणि दोघांनीही एकमेकांना ह्रदय दिले. अमृता सैफपेक्षा 12 वर्षांनी मोठी होती. त्यामुळेच दोघांनीही आपल्या नात्याची बाब घरच्यांशी लपवून गुपचूप लग्न केले.

मीडिया रिपोर्ट्सनुसार, जेव्हा त्यांच्या कुटुंबीयांना लग्नाची माहिती मिळाली तेव्हा बराच गोंधळ झाला होता, परंतु त्यानंतर दोघांचे नाते स्वीकारण्याशिवाय त्यांच्याकडे दुसरा मार्ग नव्हता. यानंतर सैफ-अमृता त्यांचे आयुष्य आनंदाने जगू लागले आणि मुलगी सारा अली खान आणि मुलगा इब्राहिम अली खान यांच्या रूपाने त्यांच्या आयुष्यात आनंद आला.

Why did Amrita Singh not marry for the second time after her divorce from Saif Ali Khan?
प्रिती झिंटाने वयाच्या 46 व्या वर्षी सरोगसीद्वारे जुळ्या मुलांना दिला जन्म

वर्षानुवर्षे सर्व काही ठीक चालले पण नंतर सैफ-अमृता यांच्या नात्यात दुरावा निर्माण झाला. अखेर दोघांनी 2004 मध्ये घटस्फोट घेऊन परस्पर संमतीने 13 वर्षे जुने नाते संपवले. घटस्फोटानंतर इटालियन मॉडेल रोजा सैफच्या आयुष्यात आली. दोघेही काही काळ लिव्ह-इनमध्ये होते पण नंतर त्यांचे ब्रेकअपही झाले.

रोजासोबत ब्रेकअप झाल्यानंतर करीना कपूरने सैफच्या आयुष्यात प्रवेश केला. टशन चित्रपटाच्या सेटवर दोघे जवळ आले. हळूहळू त्यांची जवळीक रंगली आणि मग ते लिव्ह-इनमध्ये राहू लागले. दोघांनी 2012 मध्ये लग्न केले पण सैफसोबत लग्न केल्यानंतर अमृताने दुसरं लग्न केलं नाही.

मीडिया रिपोर्ट्सवर विश्वास ठेवला तर, अमृताने फक्त तिची मुले सारा आणि इब्राहिमवर लक्ष केंद्रित केले होते, ज्यामुळे ती दुस-या लग्नाचा विचार करू शकत नव्हती. तीच्यासाठी मुले हीच पहिली प्राथमिकता आणि जग बनले.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com