'बिग बीं' लडाखवरून लगेच का परतले?

दैनिक गोमन्तक
बुधवार, 6 जानेवारी 2021

लडाखहून परत आल्यानंतर आपल्या चाहत्यांना त्याच्या प्रकृतीची माहिती देण्यासाठी  त्यांनी सोशल मीडियावर ट्विट केलं.

मुंबई: बॉलिवूड अभिनेता अमिताभ बच्चन सोशल मीडियावर नेहमीच सक्रीय असतात. कोणत्याही विषयावर ते सहजपणे त्यांचं मत मांडत असतात.  भाष्य करत असतात. अलिकडेच त्यांनी थंडीविषयी एक ट्विट केलं असून त्यांचं हे ट्विट सध्या सोशल मीडियावर चांगलच चर्चेत आहे.

आजदेखील वयाची सत्तरी ओलांडली असता, बिग बी त्यांच्या चाहत्यांमध्ये एव्हरग्रीन अभिनेता म्हणून ओळखले जातात. सध्या  ते  त्यांच्या आगामी चित्रपटाचं शूटींग करत  आहेत. या शूटींगसाठी ते नुकतेच लडाखला गेले होते. 

लडाखहून परत आल्यानंतर आपल्या चाहत्यांना त्याच्या प्रकृतीची माहिती देण्यासाठी  त्यांनी सोशल मीडियावर ट्विट केलं. ते म्हणाले की, मी लडाखला गेलो होतो, पण मला लगेच परत यावं लागलं ३३ अंश सेल्सिअसचं तेथिल तापमान होतं. मी थर्मल सूट घातला होता. परंतु हा सूटदेखील मला थंडीपासून वाचवू शकला नाही, असं कॅप्शन बिग बींनी शेअर केलेल्या फोटोला दिलं आहे. दरम्यान, लडाखमध्ये सध्या प्रचंड थंडी आहे आणइ तेथिल तापमान उणे ४० डिग्री असल्याचं सांगण्यात येत आहे. फोटोमध्ये बिग बीं  वानर कॅप, ग्लोव्हज आणि स्नो गॉगलसह दिसत आहे.

 

 

संबंधित बातम्या