लग्नाआधीच डायरेक्टरने माधुरी दीक्षितसमोर ठेवली होती अनोखी अट, आणि...

गोमंन्तक वृत्तसेवा
शनिवार, 15 मे 2021

कुमारी असूनही माधुरी दीक्षितला 'नो प्रेग्नेंसी' क्लॉजवर सही करावी लागली होती. त्यावेळी माधुरीचे प्रदर्शित झालेले जवळजवळ प्रत्येक चित्रपट हिट होत होते. माधुरी आणि संजयसोबत आलेला प्रत्येक चित्रपट बॉक्स ऑफिसवरही अप्रतिम गाजत होता.

BIRTHDAY: बॉलिवूडची दिग्गज अभिनेत्री माधुरी दीक्षित(Madhuri Dixit Birthday) चा आज  15 मे रोजी वाढदिवस आहे. माधुरी दीक्षित हिंदी चित्रपटसृष्टीतील(Bollywood) एक प्रसिद्द नाव आहे. तीच्या पुढे अजूनही कितीतरी  नायिका आणि नायक फिके पडतात. तीच्या अभिनय शैलीमुळे आजही लाखो लोक तीचे फॅन आहेत. तीने आपल्या बॉलवूड कारकीर्दीची सुरुवात भलेही फ्लॉप चित्रपटाने केली असेल, पण चांगल्या कलाकारापासून यश फार दूर असू शकत नाही. आज माधुरी दीक्षितच्या वाढदिवशी तिच्या आयुष्यातील एक रंजक किस्सा आपण जाणून घेवूया.

माधुरीने  1984 च्या 'अबोध' या चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये डेब्यू केला होता, परंतु तिथून चार वर्षांनंतर 'तेजाब' चित्रपटापासून तिला ओळख मिळाली. आणि मग माधुरीने मागे वळून पाहिले नाही. संजय दत्त आणि माधुरी दीक्षित ही जोडी हिंदी सिनेमामध्ये प्रदीर्घकाळ फेमस राहीली आहे. या दोघांनी 'खलनायक' ते 'महात्मा' पर्यंत अनेक चित्रपटात सोबत काम केले. 90 च्या दशकात त्यांच्या अफेअरचीही चर्चा जोरात सुरू होती. अशा परिस्थितीत माधुरीला तिचे यश कायम राखण्यासाठी मोठी किंमत मोजावी लागली. मिळालेल्या माहितीनुसार कुमारी असूनही माधुरी दीक्षितला 'नो प्रेग्नेंसी' क्लॉजवर सही करावी लागली होती. त्यावेळी माधुरीचे प्रदर्शित झालेले जवळजवळ प्रत्येक चित्रपट हिट होत होते. माधुरी आणि संजयसोबत आलेला प्रत्येक चित्रपट बॉक्स ऑफिसवरही अप्रतिम गाजत होता.

‘मनी हाईट्स’ मधील ‘Bella Ciao’ च्या मराठी व्हर्जनमधून दिला जातोय सामाजिक संदेश 

खरंतर चित्रपट निर्मात्यांना त्याकाळी एक वेगळीच भीती होती. संजय दत्त आणि माधूरीच्या वाढत्या जवळीकतेमुळे निर्मात्यांमध्ये एक विचित्र भीती निर्माण झाली होती. या दरम्यान माधुरीचे लग्न झाले की ती गर्भवती झाली? तर अशी विचित्र भीती निर्माता आणि दिग्दर्शकांमध्ये होती. मात्र त्यावेळी संजय दत्तचे लग्न झाले होते, परंतु त्या काळात त्यांची पत्नी परदेशात होती म्हणून संजय दत्त आणि माधुरीने बहुतेक वेळ एकत्र घालवले आणि तासन्तास एकत्र राहले. त्यामुळे दोघांच्या अफेअरची चर्चा बॉलिवूडच्या कॉरिडोरमध्ये सामान्य होती आणि हे पाहून दिग्दर्शक सुभाष घईं पण चकीत झाले होते.

नेहमी प्रमाणे सर्वजण मिळून जिंकू; शाहरुखच्या चाहत्यांना शुभेच्छा 

सुभाष घई 'खलनायक' चित्रपटात माधुरीबरोबर काम करत होते. सुभाष घईला वाटले की जर माधुरीने तिच्या चित्रपटाच्या शुटींगच्या मध्येच लग्न केले किंवा ती गर्भवती झाली तर त्यांचा चित्रपटाच शुटींग मध्यभागी थांबेल. असा विचार करून सुभाष घई(Subhash Ghai) यांनी माधुरीला 'नो प्रेग्नेंसी'(No Pregnancy) या करारावर सही करायला लावले होते. या करारानुसार जर माधूरी चित्रपटाच्या शूटिंग दरम्यान गर्भवती राहिली तर तिला भारी दंड भरावा लागेल. असे त्यात लिहिले होते. सुभाष घई हे पहिले दिग्दर्शक होते ज्यांनी नायिकेबरोबर असा करार केला होता. कदाचित या नंतर कोणी असे केले नाही.

 

संबंधित बातम्या