HBD: फरहानला त्याच्या आईने घराबाहेर काढण्याची का दिली होती धमकी?
Bollywood actor Farhan AkhtarDainik Gomantak

HBD: फरहानला त्याच्या आईने घराबाहेर काढण्याची का दिली होती धमकी?

फरहानच्या वाढदिवसानिमित्त आम्ही त्याच्याशी संबंधित काही खास गोष्टी सांगत आहोत.

आज (9 जानेवारी) प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेता, दिग्दर्शक फरहान अख्तर याचा वाढदिवस आहे. फरहान अख्तर हा प्रसिद्ध गीतकार जावेद अख्तर आणि पटकथा लेखक हनी इराणी यांचा मुलगा आहे. यंदा तो आपला 48वा वाढदिवस साजरा करत आहे. प्रोफेशनल लाईफपेक्षा फरहानचे (Farhan Akhtar) वैयक्तिक आयुष्य जास्त चर्चेत असते. फरहानच्या वाढदिवसानिमित्त (Birthday) आम्ही त्याच्याशी संबंधित काही खास गोष्टी सांगत आहोत.

फरहान अख्तरला एकदा त्याच्या आईने घरातून काढण्याची धमकी दिली होती. एका मुलाखतीत त्याने सांगितले की, कॉलेज संपल्यानंतर तो कोणतेही काम करत नसे आणि घरी बसूनच चित्रपट पाहत असे. यामुळे त्याची आई चिडली आणि त्याला घराबाहेर काढण्याची धमकी दिली. त्यामुळे त्याने 'दिल चाहता है' दिग्दर्शित केला. त्याचा पहिलाच चित्रपट सुपरहिट ठरला आणि या चित्रपटाला राष्ट्रीय पुरस्कारही मिळाला. यानंतर फरहान अख्तरने अनेक चित्रपट केले आणि त्याचा दिग्दर्शनाचा प्रवास हिट ठरला.

Bollywood actor Farhan Akhtar
Covid 19 : आशिष चंचलानी कोरोना पॅाझिटिव्ह

फरहानने 2008 साली 'रॉक ऑन' या चित्रपटातून आपल्या अभिनय कारकिर्दीला सुरुवात केली. याशिवाय भाग मिल्खा भाग, कार्तिक कॉलिंग कॉलिंग, लक बाय चान्स आणि स्काय इज पिंक या चित्रपटांमध्ये काम केले आहे. फरहानने 2000 मध्ये अधुना भाभानीशी लग्न केले. फरहान आणि अधुना यांना शाक्य आणि अकिरा ही दोन मुले आहेत. पण 2017 मध्ये फरहान आणि अधुना वेगळे झाले आणि दोघांचा घटस्फोट झाला.

फरहानचे वडील जावेद अख्तर यांनी 1978 मध्ये शबाना आझमी यांच्याशी जवळीक वाढवल्यानंतर हनी इराणीपासून वेगळे झाले. जावेद अख्तर यांनी 1984 मध्ये अभिनेत्री शबाना आझमीसोबत दुसरे लग्न केले. त्याचप्रमाणे फरहानचे अफेअर अभिनेत्री श्रद्धा कपूरसोबत होते. त्यामुळे त्याच्या आणि अधुनामध्ये अंतर आले आणि दोघांचा घटस्फोट झाला. श्रद्धा कपूरचे वडील शक्ती कपूर यांना हे नाते पसंत नव्हते. यावरून फरहान आणि शक्तीमध्ये भांडणही झाले होते.

सध्या फरहान मॉडेल आणि अभिनेत्री शिबानी दांडेकरला डेट करत आहे. दोघेही लवकरच लग्न करणार आहेत. कोरोना महामारीमुळे लग्न समारंभासाठी फक्त जवळचे मित्र आणि कुटुंबातील सदस्यांना आमंत्रित केले जाईल. मीडिया रिपोर्ट्सनुसार, फरहान 148 कोटींच्या प्रॉपर्टीचा मालक आहे. एका चित्रपटासाठी तो 3 ते 4 कोटी फी म्हणून घेतो.अभिनेत्याचे वार्षिक उत्पन्न सुमारे 22 कोटी आहे. ते जाहिरातीसाठी भरमसाठ रक्कम घेतात.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com