Hindi Films: अनुराग कश्यपने सांगितले हिंदी फिल्म न चालण्याचे खरं कारण

Anurag Kashyap
Anurag KashyapDainik Gomantak

मागील काही दिवसांपासून मोठ्या पडद्यावर येणाऱ्या हिंदी फिल्मस् प्रेक्षकांची मने जिंकण्यात अयशस्वी ठरत आहेत. त्याचा बॉक्स ऑफिसवर देखील परिणाम होत आहे. नुकताच प्रदर्शित झालेला रणबीर कपूरचा समशेरा (Ranbir Kapoor's Samshera) दणकून आदळला.संजय दत्त, रणबीर कपूर, वाणी कपूर (Sanjay Dutt, Vani Kapoor) सारखी बडी स्टार कास्ट असून देखील फिल्म चांगली कमाई करू शकली नाही. यानंतर बॉलिवूड फिल्मस् (Bollywood Films) का चालत नाहियेत यावर चर्चा सुरू झाली आहे. (Why Hindi films are not working Anurag Kashyap has the answer)

समशेरा चित्रपटाचा दिग्दर्शक करण मल्होत्रा (Karan Mallhotra) चित्रपटाला आलेल्या अपयशामुळे चांगलाच डिस्टर्ब झाला आहे. याला संजय दत्त याने एक भावनिक पोस्ट लिहून त्याचा हौसला वाढविण्याचा प्रयत्न केला. पण, तरीही हिंदी चित्रपट का चालत नाहीयेत हा मुळ प्रश्न तसाच राहत आहे. गँग्ज ऑफ वासेपूरचा दिग्दर्शक अनुराग कश्यप (filmmaker Anurag Kashyap) याने हिंदी चित्रपट का चालत नाही, आणि दक्षिणेतील चित्रपटांना का एवढा प्रतिसाद मिळत आहे. याच खरं कारण सांगितले आहे.

Anurag Kashyap
Morjim: मांद्रे, मोरजीत ‘सीआरझेड’ धाब्यावर!

अनुराग कश्यप म्हणाला हिंदी चित्रपट भारतीय संस्कृतील धरून बनवले जात नाहियेत. त्या तुलनेत तमिल, तेलगू आणि मल्याळम चित्रपटात भारतीय संस्कृतीचा संगम तुम्हाला दिसून येईल. ज्यांना हिंदी बोलता येत नाही ती लोकं हिंदी फिल्म बनवतात, असेही कश्यप म्हणाला. याच सोबत त्याने आलियाचा गंगुबाई आणि कार्तिकचा भूलभुलैय्या या चित्रपटांचे कौतुक केले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com