Deepika Padukone का होती डिप्रेशनमध्ये? केला स्वतः खुलासा

KBC मध्ये मिळालेली रक्कम दीपिका ती तिच्या मेंटल हेल्थ फाउंडेशनमध्ये वापरणार आहे अशी माहिती तिने दिली. या शो मध्ये दीपिकाने तिच्या नैराश्याबद्दल बोलताना दिसून येत आहे..
Deepika Padukone का होती डिप्रेशनमध्ये? केला स्वतः खुलासा
Deepika Padukone and Farah Khan Dainik Gomantak

अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) यांचा शो कौन बनेगा करोडपती 13 (Kaun Banega Crorepati 13) मध्ये अलीकडेच दीपिका पदुकोण (Deepika Padukone) नृत्यदिग्दर्शक फराह खानसोबत (Farah Khan) आली होती. या शो मध्ये दीपिकाने तिच्या नैराश्याबद्दल बोलताना दिसून येत आहे.

कौन बनेगा करोडपती 13 शो मध्ये शुक्रवारी दीपिका पदुकोण आणि फराह खान हॉट सीटवर बसल्या होत्या. गणेश चतुर्थीच्या विशेष प्रसंगी दीपिका आणि फराह एका महत्वाच्या कारणासाठी आल्या होत्या. या शोमधून मिळालेली रक्कम ती एका महत्वाच्या कारणासाठी वापरणार आहे असे तिने सांगितले. दीपिका ती तिच्या मेंटल हेल्थ फाउंडेशनमध्ये ही रक्कम वापरणार आहे अशी माहिती तिने दिली. या दरम्यान, त्याने आपल्या नैराश्याबद्दल मोकळेपणाने सर्वाना सांगितले.

Deepika Padukone and Farah Khan
गणेशाच्या प्रतिष्ठापनेवरुन नेटिझन्सनी शाहरुख खानला केले होते ट्रोल

दीपिकाने सांगितले की, 2014 मध्ये मी नैराश्यात होते, त्यानंतर मी खूप प्रयत्नाने मी नैराश्यातून सावारू शकले, दरम्यान आम्ही काही सेशन घेतो ज्यात आम्ही लोकांशी मानसिक आरोग्याबद्दल बोलतो. दीपिकाच्या या फाउंडेशनचे नाव 'लिव्ह लव्ह लाफ' असे आहे.

नैराश्यात नेमके काय झाले

अमिताभ बच्चन यांनी दीपिकाला नैराश्याबद्दल विचारले असता, यावर दीपिकाने सांगितले की अचानक मला एक वेगळीच भावना जाणवू लागली. आयुष्यात मला एक शून्यता जाणवली. मला असे वाटत होते की मला कामावर जायचे नाही, मला कोणालाही भेटायचे नाही. मला बाहेर जायचे नाही, मला काही करायचे नव्हते, माझी यापुढे जगण्याची इच्छाच संपली होती. मला असे वाटले की माझ्या आयुष्यात कोणतच ध्येय राहिले नाही म्हणून मी पुन्हा पुन्हा रडत असे.

हॅप्पी न्यू इयरच्या शूटिंग दरम्यान दीपिकाला झाला त्रास

त्या वेळी मी हॅप्पी न्यू इयरचे शूटिंग करत होते, दीपिकाने पुढे सांगितले की मी सीन शूट करून झाला की शॉट संपताच मी व्हॅनच्या आत रडत असे महत्वाच म्हणजे मला स्वतःला कळत नव्हते की मी का रडत आहे किंवा मला असे का वाटत आहे.

दीपिका पुढे म्हणाली की, माझे आई -वडील बंगळुरूमध्ये राहतात आणि एकदा ते मुंबईला आले. एके दिवशी विमानतळाकडे जात असताना अचानक मी पुन्हा रडू लागले. मग माझ्या आईच्या लक्षात आले की माझे रडणे वेगळे आहे. ते सामान्य रडणे नव्हते. काही ब्रेकअप झाले आहे किंवा कोणाशी भांडण झाले आहे किंवा कोणीतरी मला काहीतरी सांगितले आहे. माझी रडण्याची पद्धत खूप वेगळी होती. असे वाटले की मी मदतीसाठी ओरडत आहे. मग आईने मानसोपचार तज्ञांना बोलवले.

Deepika Padukone and Farah Khan
कंगना राणावत राजकारणात प्रवेश करेल का? त्यावर म्हणाली...

डॉक्टरांना हा आजार समजला होता

दीपिकाने पुढे सांगितले की मी मानसोपचार तज्ज्ञांना फोन करताच डॉक्टर म्हणाले की तुम्हाला ताबडतोब अपॉईंटमेंट घ्यावी लागेल, कारण त्यांना माझ्या आवाजावरून कळले की मी मानसिक आजारी म्हणजेच नैराश्याचा सामना करत आहे. त्यानंतर कित्येक महिन्यांनंतर मी ठीक झाले पण मानसिक आरोग्य ही अशी गोष्ट आहे जी आपण त्याबद्दल सहज विसरू शकत नाही. आता मी माझ्या जीवनशैलीत अनेक बदल केले आहेत.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak
www.dainikgomantak.com