सैफ अली खानचा आणि अमृता सिंगचा 'या' कारणामुळे झाला होता घटस्फोट

का तुटले होते अमृता सिंगसोबतचे पहिले लग्न, सैफ अली खानने (Saif Ali Khan) सांगितले हे धक्कादायक कारण
सैफ अली खानचा आणि अमृता सिंगचा 'या' कारणामुळे झाला होता घटस्फोट
Why was his first marriage with Amrita Singh broken, Saif Ali Khan told this shocking reason Dainik Gomantak

बॉलीवूडमध्ये विवाह आणि घटस्फोट हे सामान्य आहेत. इथे जितक्या लवकर लग्न होईल तितक्या लवकर ब्रेकअप होते. सैफ अली खान (Saif Ali Khan) आणि अमृता सिंग (Amrita Singh) यांचे नातेही असेच होते. दोघांचे लग्न 1991 मध्ये झाले. दोघांच्या वयात 12 वर्षांचे अंतर होते पण त्यांनी स्वतःच्या इच्छेने लग्न केले. यानंतर सारा अली खान (Sara Ali Khan) आणि इब्राहिम अली खान (Ibrahim Ali Khan) झाले.

लवकरच सैफ आणि अमृताच्या नात्यात दुरावा निर्माण झाला आणि लग्नाच्या 13 वर्षानंतर त्यांचा घटस्फोट झाला. दोघांचा घटस्फोट का झाला याबद्दल अनेक तर्कवितर्क लावले जात होते.त्यामुळे त्यांचे नाते कायमचे तुटले. मीडिया रिपोर्ट्सनुसार, सैफने एका मुलाखतीत सांगितले होते की, अमृताचे त्याच्या आणि त्याच्या कुटुंबाशी असलेले वागणे बदलले होते. ती त्याची आई शर्मिला टागोर, बहीण सोहा आणि सबा यांना खूप मेंटॉर करायची आणि त्यांना वाईट बोलायची.

Why was his first marriage with Amrita Singh broken, Saif Ali Khan told this shocking reason
Video: ही प्रसिद्ध अभिनेत्री बनली 'गोरिला' आणि 'चोली के पीछे' गाण्यावर केला डान्स

इतकंच नाही तर सैफच्या म्हणण्यानुसार, अमृता त्याला सतत टोमणे मारायची आणि त्याचा अपमान करायची. तो एक वाईट नवरा आणि वाईट बाप असल्याची ती त्याला प्रत्येक क्षणी जाणीव करून देत असे. या गोष्टींना कंटाळून त्याने अमृतापासून घटस्फोट घेतला.

अमृतापासून घटस्फोट घेतल्यानंतर अनेक वर्षांनी सैफने करीना कपूरसोबत दुसरे लग्न केले. दोघेही लग्नाच्या काही वर्षांपूर्वीपर्यंत लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये होते. आता सैफ-करीनाला तैमूर अली खान आणि जहांगीर अली खान अशी दोन मुले आहेत.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com